सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
उंच भरारी योजना...
सातारा जिल्हयातील सुशिक्षीत व बेरोजगार युवकांना योग्य मार्गदर्शन व संधी उपलब्ध करुन त्यांच्या
कल्याणासाठी तसेच विकासासाठी समुपदेशन, मानसोपचार, शिक्षण, कौशल्य विकास, रोजगार अशा तरतुदी
करणेसाठी उंच भरारी योजना सातारा जिल्हा पोलीस दलामार्फत राबविण्यात येत आहे. त्यामध्ये सातारा जिल्हयातील
१८ ते ३० या वयोगटातील युवक, युवती व त्यांचे पालक यांचेशी संवाद साधुन त्यांना त्यांच्या आवडीनुसार नोकरी
किंवा रोजगार उपलब्ध करुन देणे, तसेच त्यांना स्वतःच्या व्यवसायाकरीता कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार
आहे.
आज दिनांक २५/०४/२०२४ रोजी सातारा जिल्हयातील सर्व पोलीस पाटील यांची उंच भरारी योजना व
लोकसभा निवडणुक २०२४ चे अनुषंगाने पोलीस करमणुक केंद्र, अलंकार हॉल, सातारा येथे बैठक आयोजीत करणेत
आली त्यामध्ये प्रथम त्यांना लोकसभा निवडणुक २०२४ चे अनुषंगाने आवश्यक असणाऱ्या सुचना देण्यात आल्या.
तसेच उंच भरारी योजनेची संपुर्ण माहीती देवुन समाजातुन जास्तीत जास्त युवक व युवतींनी उंच भरारी योजनेचा
फायदा घ्यावा असे आवाहन मा. अपर पोलीस अधीक्षक, आंचल दलाल मा. पोलीस अधीक्षक, समीर शेख यांनी
केले.
तसेच सातारा जिल्हा पोलीस दलामार्फत राबविण्यात येणारी उंच भरारी योजनेसाठी सन टीव्हीवर प्रसारीत
होणाऱ्या मंजु कॉन्स्टेबल या मालीकेतील प्रमुख भुमिकेत असणारी अभिनेत्री मोनिका राठी यांना महिला ब्रॅन्ड
अॅम्बेसीडर व सौरभ भोसले, युटयुबर, स्टोरीटेलर, कंटेन्ट क्रिएटर यांना पुरुष ब्रॅन्ड अॅम्बेसीडर म्हणुन घोषीत करुन
उंच भरारी योजनेच्या टीशर्टचे अनावरन केले. तसेच मोनिका राठी व सौरभ भोसले यांनी उपस्थीत पोलीस पाटील व
प्रशिक्षणार्थी यांना उंच भरारी योजनेचे महत्व सांगुन सातारा पोलीस दलामार्फत राबविण्यात येणारी उंच भरारी योजना
ही सामाजिक कार्य करत असुन समाजातील युवक व युवतींना योग्य दिशा दाखविण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच
सातारा पोलीस दलाच्या व्यस्त कामातुन ते उंच भरारी सारखा सामाजिक उपक्रम राबवित असल्याबाबत पोलीस दलाचे
आभार व्यक्त केलेले आहे. तसेच कोंडवे, ता.
जि. सातारा या गावातील पोलीस पाटील, बाबुराव एकनाथ गायकवाड
यांनी उंच भरारी योजना सुरु झालेपासुन या योजनेची माहीती त्यांचे स्तरावर जनमानसांमध्ये प्रसारीत करुन त्यांचेमार्फत
उंच भरारी योजनेमध्ये जास्तीत जास्त युवकांनी सहभाग घेतलेला असल्याने त्यांचा सातारा जिल्हा पोलीस दलामार्फत
त्याचा मा. पोलीस अधीक्षक, समीर शेख यांचेहस्ते सत्कार करणेत आला आहे.
प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन, भोर, ता. भोर, जि. पुणे यांचे माध्यमातुन ४५ दिवसांचे प्रशिक्षणाकरीता सातारा
जिल्ह्यातुन असिस्टंट इलेक्ट्रीशियन (हाऊसहोल्ड वायरींग व सोलार ) या कोर्सचे प्रशिक्षणाकरीता एकुण १९ युवकांना
मा. अपर पोलीस अधीक्षक, आंचल दलाल व मा. पोलीस अधीक्षक, समीर शेख यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर सर्व
युवकांना वाहनातून भोर येथे प्रशिक्षणाकरीता रवाना केले.
सातारा जिल्हा पोलीस दल व प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन प्रशिक्षण संस्था यांचे संयुक्त विद्यमानाने १. दुचाकी
रिपेअरिंग/ मॅकेनीकल, २. चारचाकी रिपेअरिंग / मॅकेनीकल ३. हॉटेल मॅनेजमेंट, ४. असिस्टंट इलेक्ट्रीशियन, ५.
प्लंबिंग, ६. वेल्डींग, ७. जनरल ड्युटी असिस्टंट या कोर्सचे प्रशिक्षणाकरीता कोल्हापूर, भोर जि. पुणे, अहमदनगर व
छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पाठविण्यात आले आहे. आजअखेर उंच भरारी उपक्रमाअंतर्गत एकुण ७६० युवक
व युवतींना प्रशिक्षण व रोजगार प्राप्त झालेला आहे. तसेच या योजनेत समाविष्ट झालेल्या इतर युवकांना त्यांच्या
आवडीनुसार नोकरी किंवा रोजगार तसेच त्यांना स्वतःच्या व्यवसायाकरीता कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येत आहे.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121


Post a Comment
0 Comments