सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
घरफोडी चोरीचे ५ गुन्हे उघड करून ३५ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत.
स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांची उल्लेखनिय कामगिरी
पोलीस अभिलेखावरील आरोपींकडून ५ घरफोडी चोरीचे गुन्हे उघड करुन त्यांचेकडून चालू बाजारभावाप्रमाणे
२४,५०,०००/- रुपये किमतीचे ३५ तोळे सोन्याचे दागिणे हस्तगत.
दि.१३/०३/२०२४ रोजीचे ११.३० ते सायंकाळी ५.३० वा.चे. दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयाने फिर्यादी
यांच्या बंद घराची कडी कोणत्यातरी, हत्याराने तोडून आत प्रवेश करुन घराच्या कपाटातील ९,२९,५००/- रुपये
किमतीचे २९ तोळे ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे व रोख रक्कम चोरुन नेले होते त्याबाबत सातारा शहर
पोलीस ठाणे गु.र.नं. २५१/२०२४ भादविक ४५४, ३८० प्रमाणे नोंद करण्यात आलेला आहे.
श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे
मागदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांचे सुचनेप्रमाणे नमुद गुन्हा
पोलीस अभिलेखावरील आरोपी सुनिल उर्फ सुशिल बबन भोसले याने केला असल्याचे निष्पन्न करुन त्याचेकडून
नमुद गुन्हयात चोरीस गेलेले सोन्याच्या दागिण्यापैकी २६ ग्रॅम सोन्याचे दागिणे यापुर्वी हस्तगत करण्यात आले
होते. तद्नंतर नमुद गुन्हयात आणखी एका इसमाचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास पोलीस उपनिरीक्षक विश्वास
शिंगाडे व त्यांचे तपासपथकाने ताब्यात घेवून त्याचेकडून नमुद गुन्हयात चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिण्यापैंकी
१७,५०,०००/- रुपये किमतीचे २५ तोळे सोन्याचे दागिणे हस्तगत करण्यात आलेले आहेत.
तसेच दि.२५/०२/२०२४ रोजीचे रात्रौ ८.०० ते दि. २६/०२/२०२४ रोजीचे पहाटे ०४.०० वा. च्या दरम्यान गोटे
ता.कराड जि.सातारा येथील फिर्यादी यांचे घराचे दरवाजाची कडी कोयंडा कोणी तरी अज्ञात चोरटयाने तोडून
६५,०००/- रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिणे चोरी केले होते त्याबाबत कराड शहर पोलीस ठाणे
गु.र.नं.२१६/ २०२४ भादविक ४५७, ३८०, ३४ अन्वये नोंद करण्यात आलेला होता.
पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक
विश्वास शिंगाडे व तपास पथकाने नमुद गुन्हा पोलीस अभिलेखावरील आरोपी राहुल हिरामण लष्करे
रा.काळाखडक वाकड ता. मुळशी जि.पुणे व अजय एकनाथ चव्हाण गहुंजे ता. मुळशी जि.पुणे यांनी केला
असल्याचे निष्पन्न करुन त्यांना ताब्यात घेवून त्याचेकडून नमुद गुन्हयात चोरीस गेलेले व इतर ३ गुन्हयात चोरीस
गेलेल्या सोन्याच्या दागिण्यापैकी ७,००,०००/- रुपये किमतीचे १० तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे हस्तगत
करण्यात आलेले आहेत. नमुद आरोपींच्याकडून एकूण ५ घरफोडी चोरीचे गुन्हे उघड करुन चालू
बाजारभावाप्रमाणे २४,५०,०००/- रुपये किमतीचे एकूण ३५ तोळे सोन्याचे दागिणे हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे
शाखेस यश प्राप्त झाले आहे.
माहे नोव्हेंबर २०२२ पासून दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, मोटार सायकलचोरी, इतर चोरी असे एकूण
२७६ मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणले असून नमुद गुन्हयातील चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिण्यांपैकी ५८५
तोळे (५ किलो ८५० ग्रॅम ) असा एकूण ४,०७,४०,९००/- रुपये ( चार कोटी, सात लाख, चाळीस हजार, नवशे
रुपये) किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे
मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, सुधीर पाटील, रोहित
फार्णे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, तानाजी माने, पोलीस अंमलदार सुधीर बनकर,
विश्वनाथ संकपाळ, अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, मंगेश महाडीक,
साबीर मुल्ला, लक्ष्मण जगधने, लैलेश फडतरे, सचिन साळुंखे, प्रविण फडतरे, अमोल माने, अविनाश चव्हाण,
अमित माने, मोहन नाचण, अजित कर्णे, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, हसन तडवी, मुनीर मुल्ला, सनी
आवटे, गणेश कापरे, जयवंत खांडके, स्वप्नील कुंभार, शिवाजी भिसे, मनोज जाधव, राजू कांबळे, अरुण
पाटील, अजय जाधव, अमित झेंडे, विक्रम पिसाळ, मोहन पवार, ओंकार यादव, प्रविण कांबळे, रोहित निकम,
स्वप्नील दौंड, विशाल पवार, सचिन ससाणे, पृथ्वीराज जाधव, केतन शिंदे, धीरज महाडीक, मोहसनि मोमीन,
वैभव सावंत, शिवाजी गुरव, पंकज बेसके, अमृत कर्पे, संभाजी साळुंखे, दलजित जगदाळे, विजय निकम,
दिपाली यादव, सौजन्या मोरे, आधिका वीर, शकुंतला सणस, अनुराधा सणस यांनी सदरची कारवाई केलेली
असुन कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व श्रीमती
आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केलेले आहे.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121

Post a Comment
0 Comments