सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
पोलीसांवर हल्ला करून फरार झालेले 2 आरोपी ताब्यात.
शाहुपूरी पोलीस ठाणे हद्दीत सातारा पोलीस विभागाची आकाशवाणी झोपडपट्टी व मतकर
कॉलणी झोपडपट्टी येथे कोंबीग ऑपरेशन राबवुन पोलीसावर हल्ला करुन फरार झालेले 02
आरोपी ताब्यात
मा. पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल, यांनी
मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजीव नवले, पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र म्हस्के सातारा शहर पोलीस
ठाणे, पोलीस निरीक्षक श्री. निलेश तांबे शाहुपुरी पोलीस ठाणे यांना शाहुपुरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये वाढ
गुन्हेगारीच्या अनुषंगाने आकाशवाणी झोपडपट्टी व मतकर कॉलणी झोपडपट्टी सातारा येथे कोबींग ऑपरेशन
राबवुन माहितगार गुन्हेगार व त्यांची राहती घरे चेक करणेबाबत सुचना दिल्या होत्या.
त्याप्रमाणे दि.29/07/2024 रोजी शाहुपूरी पोलीस ठाणे हद्दीतील आकाशवाणी झोपडपट्टी व मतकर
कॉलणी झोपडपट्टी सातारा येथे कोबींग ऑपरेशन दरम्यान तेथील 29 गुन्हेगार व त्यांची घरे चेक करत असताना
दोन संशयीत इसम हे मतकर कॉलणी झोपडपट्टी सातारा येथुन पळुन जात असताना त्यांना पोलीस अंमलदार
यांनी पाठलाग करुन पकडले असता सदरचे संशयीत इसम हे सातारा शहर पोलीस ठाणे गुरनं. 636/2024
भारतीय न्याय संहिता कलम 109 (1), 132,121(2),115(2),352,351 (2), 3(5) मधील सातारा शहरातील
एस.टी. स्टँड चौकीचे पोलीस अंमलदारास मारहान करुन फरार झालेले आरोपी नामे 1) रोहण विलास थोरात
वय.20 वर्षे रा.मतकर कॉलणी सातारा 2) प्रथमेश सुनिल साळुंखे वय 20 वर्षे रा. आव्हाडवाडी दिव्यनगरी सातारा
यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच सदर कारवाई दरम्यान महाराष्ट्र दारु बंदी कायदा कलम प्रमाणे 01
कारवाई व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 110/117 प्रमाणे 02 कारवाई करणेत आल्या आहेत. त्याचप्रमाणे
विना नंबर प्लेटच्या 15 मोटारसायकल ताब्यात घेवुन त्यावर एम. व्ही. अॅक्ट प्रमाणे करावई केली आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल,
मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजु नवले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र म्हस्के सातारा
शहर पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक श्री. निलेश तांबे शाहुपुरी पोलीस ठाणे, म. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती
श्रद्धा आमले, सहा.पोलीस निरीक्षक श्री. अभिजित यादव वाहतूक नियंत्रण शाखा सातारा, पोलीस उप-निरीक्षक
कुमार ढेरे, पोलीस उप-निरीक्षक अमित पाटील व शाहुपुरी, सातारा शहर, स्थानिक गुन्हे शाखा, वाहतूक नियंत्रण
शाखा सातारा शहर, पोलीस मुख्यालय सातारा येथील 03 आर. सी. पी. पथक मधील पोलीस अंमलदार यांनी केली
आहे.

Post a Comment
0 Comments