सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
चोरीच्या उद्देशाने आलेला संशयित आरोपी फलटण शहर पोलीसांच्या ताब्यात.
दि.27/7/2024 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास फलटण येथील नाना पाटील चौकामध्ये एका बंद असलेल्या दुकानाच्या शटर जवळ संशयास्पद इसम तुकाराम बापू खरात वय 55 वर्ष रा.मोरोची ता.माळशिरस जि.सोलापुर हा चोरीच्या उद्देशाने अंधारात उभा असता त्यास चौकशी केली असता त्याला समाधान कारक उत्तर देता आले नाही त्यामुळे त्याच्या विरुद्ध फलटण शहर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र सुभाष टिके वय 28 वर्ष यांनी फिर्याद दाखल करून 373/2024 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या सर्व घटनेचा अधिक तपास म.पो.ना.बोबडे हे करीत आहेत.

Post a Comment
0 Comments