Type Here to Get Search Results !

आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे भात लागवड प्रात्यक्षिक संपन्न.

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे भात लागवड प्रात्यक्षिक संपन्न.


सातारा दि.3 : मालचौंडी तालुका जावली येथे कृषी विभाग   व आत्मा सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सबलीकरण व सक्षमीकरण अंतर्गत शेतकरी व शेतमजूर यांचा,  भात पीक लागवड तंत्रज्ञान तसेच भात पीक चर्चासत्र मेळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

  मेळाव्यास जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी   भाग्यश्री फरांदे, तालुका कृषी अधिकारी तेजदीप ढगे, मंडल कृषी अधिकारी बापूसाहेब स्पनवर, कृषी पर्यवेक्षक अजय पवार, कृषी सहाय्यक उमेश संकपाळ, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक   सचिन नेवसे तसेच मालचौंडी गावचे   ग्रामस्थ उपस्थित होते. 

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्रीमती  फरांदे, यांनी भात पिकाचे अर्थशास्त्र, चार सूत्री पद्धतीने भात लागवड, कृक्षी विभागाच्या इतर सर्व शासकीय योजना व गावातील सेंद्रिय शेतीबाबत नियोजन इत्यादी विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.  तसेच   फळबाग लागवडीस  भेट देऊन मार्गदर्शन केले.  

आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇👇👇👇👇👇

https://chat.whatsapp.com/EAcU5UeglYl6sOte0VCfZL

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप 

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments