सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
शिव शस्त्र शौर्य प्रदर्शनाच्या तयारीचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा.
सातारा दि. 4: शिव शस्त्र शौर्य प्रदर्शनांतर्गत जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय येथे शिवाजी महाराजांनी अफझल खानाच्या भेटी वेळी वापरलेले वाघनखे प्रदर्शित करण्यात येणार आहेत. याच महिन्यात होणाऱ्या या कार्यक्रमाच्या तयारीचा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आढावा घेतला.
या बैठकीस पुरातत्व व वस्तु संग्रहालय संचालनालय, मुंबईचे संचालक सुजितकुमार उगले, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, सातारचे प्रांताधिकारी सुधाकर भोसले, विभागीय पर्यटन कार्यालय पुणेचे उपसंचालक शमा पवार, पुरातत्व वस्तु संग्राहलयाचे उपसंचालक हेमंत दळवी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाच्या तयारीचा सविस्तर आढावा घेऊन जिल्हाधिकारी यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या. त्यामध्ये पोलीस विभागाने सुरक्षा तपासणी करावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने संग्रहालयाच्या परिसराची स्वच्छता करावी. संग्रहालयाने इमारत सुशोभिकरण करावे. कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्यांसाठी पासची व्यवस्था करावी. मुख्य कार्यक्रम संग्रहालयाच्या इमारतीत पार पडेल तर सांस्कृतिक कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय सभागृहात संपन्न होईल. या अनुषंगाने जिल्हा परिषद, संग्रहालय व पोलीस विभाग यांनी योग्य ते नियोजन करावे. येणाऱ्या लोकांसाठी पार्कींगची व्यवस्था करावी. तसेच प्रदर्शनाच्या उद्घटनानंतर पुढील 9 महिने हे प्रदर्शन सुरु राहणार आहे. त्या दृष्टीने ऑनलाईन तिकीट विक्रीची व्यवस्था ठेवावी. शालेय व महाविद्यालयींन विद्यार्थ्यांसाठी प्रदर्शन पाहण्याची व्यवस्था शिक्षण विभागाने करावी. पार्कींगसाठी आयटीआयची जागा संग्रहालयाने लीजवर घ्यावी. पार्किंगची व्यवस्था पे ॲन्ड पार्क असावी. त्यामुळे पार्किंगला शिस्त राहील व वाहतुक कोंडी होणार नाही. संग्रहालयाच्या इमारतीच्या मागील रिकाम्या जागेतही पार्किंगची व्यवस्था करावी. तसेच सुरक्षेसाठी खासगी संस्था नेमावी.
शिव शस्त्र शौर्य प्रदर्शनांतर्गत जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय येथे शिवाजी महाराजांनी अफझल खानाच्या भेटी वेळी वापरलेले वाघनखे प्रदर्शित करण्यात येणार आहेत. याच महिन्यात होणाऱ्या या कार्यक्रमाच्या तयारीचा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आढावा घेतला.
आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -👇👇👇👇
https://chat.whatsapp.com/EAcU5UeglYl6sOte0VCfZL
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121

Post a Comment
0 Comments