Type Here to Get Search Results !

खंडाळा येथील मोनिका लॉजवर पोलिसांचा छापा.

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

खंडाळा येथील मोनिका लॉजवर पोलिसांचा छापा.


(स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांची कारवाई)

( खंडाळा गावचे हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावरील मोनिका लॉज येथे कुंटणखाना चालविणारे सात इसमांचेवर कारवाई.)

श्री. तुषार दोशी पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी

सातारा जिल्हयात बेकायदेशीर चालणाऱ्या कुंटणखान्याची माहिती प्राप्त करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या

सुचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिलेल्या आहेत.

पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी त्याअनुशंगाने स्थानिक गुन्हे शाखा सातारा अंतर्गत असणाऱ्या अनैतिक

मानवी व्यापार प्रतिबंधक पथकाच्या महिला पोलीस उपनिरीक्षक श्वेता पाटील यांना सातारा जिल्हयात बेकायदेशीर

चालणाऱ्या कुंटणखान्याची माहिती प्राप्त करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.

दि.१३/०८/२०२५ रोजी श्रीमती डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांना त्यांचे विश्वसनीय

बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, मौजे खंडाळा ता. खंडाळा जि.सातारा गावचे हद्दीतील सातारा ते पुणे जाणारे

राष्ट्रीय महामार्गावरील मोनिका लॉजचे चालक मालक यांनी वेश्यागमनाकरीता मुली ठेवल्या आहेत व ते मागणी केले

प्रमाणे त्या ठिकाणी पुरुष ग्राहकांना मुली पुरवितात, अशी माहिती प्राप्त झाल्यानंतर त्यांनी त्यांचे अधिपत्याखाली

स्थानिक गुन्हे शाखा सातारा, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथक सातारा तसेच खंडाळा पोलीस ठाणेकडील पोलीस

अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार केले. श्रीमती डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी व त्यांचे

पथकाने खंडाळा गावचे हद्दीतील मोनिका लॉज येथे छापा टाकून वेश्यागमनाचा मोबदला स्वतःच्या उपजिविकेसाठी

स्विकारुन, पिडीत महिलांना ग्राहकांसाठी वेश्यागमनासाठी उदयुक्त करुन, वेश्या व्यवसायाच्या कमाईतील मिळकतीवर

अवलंबून राहून, वेश्या व्यवसायास प्रेरणा देणाऱ्या इसम नामे १) राहुल वसंता श्रृंगारे रा. स्टारसिटी शिरवळ ता. खंडाळा

जि.सातारा, २) रावेश शेट्टी, ३) मोहम्मद जावेद अख्तर, ४) दत्ता राजू देवकर, ५) हरिष वासूदेव शेट्टी, ६) शुभम

आप्पासो घुले, ७) रंजनकुमार लक्ष्मण मल्लीक सर्व रा. मोनाली लॉज पारगाव खंडाळा यांना ताब्यात घेतले व ६ पिडीत

महिलांची सुटका करुन नमुद इसमांचे विरुध्द खंडाळा शहर पोलीस ठाणे गु.र.नं. १३३ / २०२५ भा.न्या.सं.क १४३ (२),

१४४(२) सह मानवी अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ४, ५ अन्वये गुन्हा नोंद केला आहे.

श्री. तुषार दोशी पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे

मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस निरीक्षक एस. एस. शेळके, सहायक पोलीस निरीक्षक म्हस्के,

महिला पोलीस उपनिरीक्षक श्वेता पाटील, पोलीस अंमलदार रामचंद्र गुरव, संजय शिर्के, शरद बेबले, प्रविण फडतरे,

विक्रम पिसाळ, रविराज वर्णेकर, मोना निकम, आदिका वीर, अनुराधा सणस, तृप्ती शिंदे, शहनाज शेख खंडाळा

पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार दिघे, चव्हाण, नेवसे यांनी सदरची कारवाई केली आहे. कारवाई मधील सर्व

अधिकारी व अंमलदार यांचे श्री. तुषार दोशी पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती डॉ. वैशाली कडुकर अपर पोली

अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments