सह्याद्री निर्भिड न्यूज
साखरवाडी/ हरिदास सावंत (सर)
साखरवाडी विद्यालयातील विद्यार्थ्यांना " रत्नबन शिष्यवृत्तीचे " वितरण..
साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांना रत्नबन प्रतिष्ठानच्या " रत्नबन शिष्यवृत्तीचे " वितरण....माननीय प्रल्हादरावजी साळुंखे पाटील यांचेकडून उपक्रमाचे विशेष कौतुक
साखरवाडी ता.फलटण येथील श्री वीरेंद्र जाधव आणि जाधव परिवाराने स्थापन केलेल्या रत्नबन प्रतिष्ठानच्या " रत्नबन शिष्यवृत्तीचे " वाटप आज साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभागात करण्यात आले. साखरवाडी शिक्षण संस्थेच्या विश्वस्त समितीचे अध्यक्ष माननीय श्री प्रल्हादरावजी साळुंखे पाटील यांच्या शुभहस्ते विद्यालयातील एकूण सहा विद्यार्थ्यांना रुपये १२ हजारांची ही रक्कम वितरीत करण्यात आली. शिष्यवृत्तीचे हे सलग चौथे वर्ष आहे.यावर्षी हा बहुमान विद्यालयातील कुमारी वैष्णवी खरात , स्नेहा सावळकर , आर्या बोंद्रे , प्रज्ञा पवार , दुर्वा कदम आणि निशा आवळे यांना मिळाला असून रोख रकमेसह रत्नबन प्रतिष्ठानचे विशेष स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन या सर्वांना माननीय श्री प्रल्हादरावजी साळुंखे पाटील यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. माननीय श्री साळुंखे पाटील यांनी या उपक्रमाचे विशेष अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी साखरवाडी शिक्षण संस्थेच्या सचिव तथा माध्यमिक विभागाच्या विद्यमान मुख्याध्यापिका सौ उर्मिलाताई जगदाळे , प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय श्री वीरेंद्र जाधव , उपाध्यक्ष श्री विनोद जाधव , सचिव श्री हरिदास सावंत सर तसेच श्री जाधव परिवारातील माननीय श्री बबनराव जाधव , सौ रत्नमालाताई जाधव , सौ रेश्माताई जाधव त्याचबरोबर संस्थेच्या प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री संदीप चांगण , विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी , सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.याच कार्यक्रमात साखरवाडी विद्यालय माजी विद्यार्थी संघाच्या वतीने प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींना मोफत शालेय गणवेष वाटप करण्यात आले. हे सर्व गणवेष माजी विद्यार्थी श्री भाऊसाहेब पवार ( सुरवडी) यांनी देवू केले. प्रतिष्ठानचे आणि माजी विद्यार्थी संघाचे सचिव श्री हरिदास सावंत सरांनी आपल्या मनोगतात प्रतिष्ठानच्या आजवरच्या वाटचालीबाबत माहिती देवून भविष्यातील योजनांबाबत सविस्तर माहिती दिली. माजी विद्यार्थी संघाच्याही वाटचालीचा आढावा सादर केला. माननीय श्री प्रल्हाद रावजी साळुंखे पाटील यांनी आपल्या भाषणात श्री जाधव परिवाराच्या या उपक्रमाचे व एकंदरीत जाधव परिवाराचे विशेष अभिनंदन करून भविष्यातील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Post a Comment
0 Comments