सह्याद्री निर्भिड न्यूज
साखरवाडी/ हरिदास सावंत (सर)
संविधान दिनाच्या निमित्ताने साखरवाडी विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन.
२६ नोव्हेंबर या राष्ट्रीय संविधान दिनाच्या निमित्ताने साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभागात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.विद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनीं आणि शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनिंनी संविधान प्रतिमेचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामूहिक संविधान वाचन केले.काही विद्यार्थी व शिक्षकांनी संविधानाची माहिती सांगून महत्व विषद केले.त्यानंतर संविधान रॅली काढण्यात आली.विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ उर्मिलाताई जगदाळे यांचे मार्गदर्शनाखाली विद्यालयातील श्री जयवंत सस्ते , श्री महादेव लांडगे , श्री नितीन शिंदे , श्री सुनील भोसले , श्री गोपाल कांबळे , श्री रोहिदास गावित , श्री प्रशांत रासकर , श्री सागर बोबडे , श्री जयंत काळोखे ,सौ मीरा जगताप या व विद्यालयातील इतर सर्वच शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींनी संपूर्ण कार्यक्रमाचे उत्तम आयोजन केले.याप्रसंगी मूल्य वर्धन तालुका समन्वयक श्री धाईंजे तसेच साखरवाडी विद्यालय माजी विद्यार्थी संघाचे कार्यवाह श्री हरिदास सावंत सर यांचीही उपस्थिती होती.

Post a Comment
0 Comments