Type Here to Get Search Results !

श्री गणपत विठ्ठल भोसले प्रतिष्ठान , साखरवाडी आयोजित मकर संक्रांती विशेष मेहंदी स्पर्धांचे उद्या आयोजन.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

साखरवाडी/हरिदास सावंत (सर)

 श्री गणपत विठ्ठल भोसले प्रतिष्ठान , साखरवाडी आयोजित मकर संक्रांती विशेष मेहंदी स्पर्धांचे उद्या आयोजन.



साखरवाडी ता. फलटण , जि. सातारा येथील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या गणपत विठ्ठल भोसले प्रतिष्ठानने  महिला भगिनींसाठी खास संक्रांती स्पेशल मेहंदी स्पर्धांचे आयोजन उद्या सोमवार दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी संध्याकाळी पाच वाजता श्री भवानीमाता मंदिर, साखरवाडी , बाजारपेठ येथे केले असल्याची माहिती प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री सचिन भोसले , उपाध्यक्ष श्री संजय भोसले व सचिव श्री हरिदास सावंत सर यांनी दिली आहे.स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक रुपये ३०००/- , द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक रुपये २०००/- व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक रुपये १०००/- असून सोबत स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.स्पर्धा फक्त महिला भगिनिंसाठी असून खुल्या स्वरूपाच्या आहेत.प्रत्येक स्पर्धकाला प्रतिष्ठान कडून दोन मेहंदी कोन दिले जातील.स्पर्धकासोबत अन्य एकजण सोबत असणे आवश्यक आहे.प्रवेश विनामूल्य आहे.             

त्याचबरोबर प्रतिष्ठान ने बुधवार दिनांक १४ जानेवारी २०२६ रोजी संक्रांती निमित्त  संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत श्री भवानीमाता मंदिरात सर्व नागरिकांसाठी तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.याही कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments