सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
फलटण येथील कृषी महाविद्यालयातील कृषीदूतांनी केली शेतकऱ्यांसाठी व्हाट्सऍप गटाची निर्मिती.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरी संलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषीदूतांनी सोशल मीडियावर शेतकरी गटाची निर्मिती केली ग्रामीण जागरुकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प कार्यक्रमांतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषीदूतांनी गावातील शेतकऱ्यांचा व्हॉट्सअँप या सोशल मीडिया वर "कृषी संवाद दुधेबावी" हा ग्रुप तयार केला.
या ग्रुप अंतर्गत पीक उत्पादन, रोग व किडीचे निवारण, सरकारी योजनेचा प्रसार, प्रगतशील शेतकर्यांची यशोगाथा, शेतीचे नवनवीन तंत्रज्ञान, शेतीच्या निगडीत समस्याचे निवारण याबद्द्ल माहिती प्रसारित केली गेली.
या कार्यक्रमासाठी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू.डी. चव्हाण, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.डी.निंबाळकर, कार्यक्रम समन्वयक प्रा. एन. एस. धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एम. साळुंखे, कार्यक्रम अधिकारी प्रा. एन. ए. पंडित, AIA प्रमुख डॉ. जी. बी.अडसूळ, यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत रामराजे कुलाळ, अभिषेक मोरे, ऋषिकेश ओंबासे, रोहित वाघमारे, प्रणव साळुंखे, झहीर मनेरी, श्रीराम मोहिते. यांनी हा कार्यक्रम आयोजित केला.

Post a Comment
0 Comments