सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
सरदार वल्लभभाई हायस्कूल व जुनिअर कॉलेज साखरवाडी येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.
दि. २७/०१/२०२६ रोजी सरदार वल्लभभाई हायस्कूल व जुनिअर कॉलेज एच एस सी व्होकेशनल विभाग साखरवाडी येथे विद्यार्थी , शिक्षक , शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समवेत वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी स्कूल कमिटीचे व्हाईस चेअरमन श्री. बापूसाहेब नाईक निंबाळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करून करण्यात आली. प्रशालेचे प्राचार्य श्री. जाधव जी ए यांनी कार्यक्रमाचे प्रास्तावित केले व श्री. मारुती साळवे सर व श्री. राहुल बोबडे सर यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले त्याचप्रमाणे कार्यक्रमास उपस्थित असणारे श्री. नाचन सर , सौ. अंजुम मोमीन मॅडम ,सौ निकम मॅडम पोलीस हवालदार , श्री. विकास जाधव , श्री. रवींद्र हुंबरे सर , श्री. नवले सर , श्री. दत्तात्रेय साळुंखे , श्री. समीर मुलानी , श्री. धीरज सोनवणे , यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांनी कार्यक्रमासंदर्भात आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर केले. विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर नृत्य सादर केले. यावेळेस विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. रघुनाथ शेळके सर यांनी केले व कार्यक्रमाच्या शेवटी प्रशालेचे प्राचार्य श्री. जाधव जी ए यांनी सर्वांचे आभार मानले.

Post a Comment
0 Comments