Type Here to Get Search Results !

सुखेड येथील खुनाच्या प्रकरणातील आरोपी ७२ तासांच्या आत जेरबंद, साखरवाडी येथुन एका आरोपीस अटक.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

सुखेड येथील खुनाच्या प्रकरणातील आरोपी ७२ तासांच्या आत जेरबंद, साखरवाडी येथुन एका आरोपीस अटक.





(स्थानिक गुन्हे शाखा सातारा व लोणंद पोलीस ठाणे यांची कारवाई.)

( सुखेड, ता.खंडाळा जि.सातारा गावचे हद्दीत अनोळखी इसमाचा गळा आवळून खुन करुन त्याचे पाय बांधून, अंगावर पेट्रोल

ओतून पेटवून देवून त्यास विहीरीमध्ये ढकलून देवून खुनाचा पुरावा नाहीसा करणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या

कौशल्यपूर्ण तपासाअंती अटक )

०६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ०९.३० वा. चे सुमारास मौजे सुखेड, ता.खंडाळा, जि. सातारा गावचे हद्दीत चोपडे

वस्तीजवळील आबा जयवंत चोपडे यांचे विहीरीमध्ये एक अनोळखी पुरुष वय अंदाजे २५ ते ३० वर्षे जातीचे प्रेत त्यास अर्धवट

जाळुन त्याचे हातपाय बांधलेल्या अवस्थेत मिळून आल्याने लोणंद पोलीस ठाणे अकस्मात मयत रजिष्टर नंबर ०९ / २०२६

भा.ना.सु.सं.क.१९४ अन्वये दाखल करण्यात आले होते.

नमुद घटनेची माहिती प्राप्त होताच श्री. तुषार दोशी, पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती डॉ. वैशाली कडुकर, अपर पोलीस

अधीक्षक सातारा, श्री. विशाल खांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण उप-विभाग, श्री. अरुण देवकर, पोलीस निरीक्षक

स्थानिक गुन्हे शाखा सातारा, श्री. शिवाजी जायपत्रे, सहायक पोलीस निरीक्षक लोणंद पोलीस ठाणे यांनी घटनास्थळी भेट दिली.

घटनास्थळाची व अज्ञात मयत इसमाच्या मृतदेहाचे पाहणी केली असता मृतदेहाचे पाय बांधलेल्या स्थितीत दिसून आल्याने नमुद

व्यक्तीचा घातपात झाला असल्याबाबत प्रथमदर्शनी दिसून आल्याने श्री. तुषार दोशी, पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती डॉ. वैशाली

कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी पोलीस निरीक्षक अरुण देवकर व सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांना

सदरचा गुन्हा उघड करुन गुन्हयातील अज्ञात मयत इसमाचा व आरोपींचा शोध घेण्याच्या सुचना दिल्या.

श्री. विशाल खांबे उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण उपविभाग फलटण, श्री. अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक

गुन्हे शाखा सातारा यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील व लोणंद पोलीस ठाण्याकडील तपास पथके तयार करुन त्यांना नमुद मयताचा

तपास करण्याच्या सुचना दिल्या.

पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या अधिपत्याखाली सपोनि रमेश गर्जे यांच्या अधिपत्याखालील स्थानिक गुन्हे शाखेच्या

पथकाने घटनास्थळाची पाहणी करुन घटनास्थळाचे आजुबाजुचे परिसरातील साक्षीदार यांचेकडे विचारपुस करुन घटनाटिकाणचे

तसेच घटनाठिकाणाकडे येणा-या जाणा-या मार्गावरील सीसीटीव्ही ची पाहणी करुन एक संशयीत कार निष्पन्न केली. स्थानिक गुन्हे

शाखेच्या पथकाने सलग ३ दिवस अहोरात्र परिश्रम घेवुन सदर संशयीत कारबाबत अधिक तपास केला असता सदर अनोळखी

इसमाचा खुन कळंबोली येथील मुख्य संशयीताने त्याचे साखरवाडी ता. फलटण येथील१) बंडू बापू भिसे वय 49 वर्षे, रा. के एल 5 बिल्डिंग नंबर 15 रूम नंबर 16 सेक्टर 3 इ कळंबोली ता. पनवेल जि. रायगड मूळ रा. दुधेबावी ता. फलटण जि. सातारा २) विजय पोपटराव पवार वय 36 वर्षे, रा. साखरवाडी माडकर मळा तालुका फलटण जिल्हा सातारा,३) किरण विकास गायकवाड वय 27 वर्षे, मूळ रा. होळ तालुका फलटण जिल्हा सातारा हल्ली रा. पंचम सोसायटी पारी चौक गणपती मंदिराजवळ दुसरा मजला पुणे, ४) श्रीनिवास ज्ञानेश्वर लोणे वय 25 वर्षे, रा .चुरमापुरी तालुका अंबड जिल्हा जालना हल्ली राहणार धायरीश्वर संकुल रायकर मळा धायरी पुणे.

व पुणे येथील साथीदारांसह केल्याची माहिती प्राप्त

झाली. सदर गुन्हयाचे प्राथमिक तपासाअंती लोणंद पोलीस ठाणे गु.र.नं. ६५/२०२६ भा.न्या.सं.क.१०३ (१), २३८ प्रमाणे खुनाचा गुन्हा

दाखल करण्यात आला.

सदर माहितीच्या अनुषंगाने ९ फेब्रुवारी २०२६ रोजी श्री. तुषार दोशी, पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती डॉ. वैशाली कडुकर,

अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री. विशाल खांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण उप-विभाग, श्री. अरुण देवकर, पोलीस

निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेकडील सपोनि रमेश गर्जे यांचे पथक तात्काळ

कळंबोली येथे रवाना झाले. नमुद इसमास स्थानिक पोलीसांचे मदतीने ताब्यात घेवून सदर गुन्हयाच्या अनुषंगाने विचारपूस केली

असता त्याने प्रथम काहीएक माहिती दिली नाही. तरी देखील त्याचेकडे त्याचेकडे Interrogation Skill चा वापर करुन आणखी

सखोल विचारपूस केली असता त्याने नमुद इसमाचा त्याच्या मैत्रीणीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन त्याचे इतर तीन

साथिदारांचे मदतीने कळंबोली येथून स्वत:चे होडा सिटी कारमध्ये जबरदस्तीने टाकुन दोरीने त्याचे हातपाय बांधुन दुस-या दोरीने

त्याचा गळा आवळून खुन केल्याचे तसेच नंतर त्याचा मृतदेह त्याच होंडा सिटी कार क्रमांक MH-12 DY 8846 मधून मौजे सुखेड,

ता.खंडाळा, जि.सातारा गावचे हद्दीत चोपडे वस्ती येथे आणून त्याच्या प्रेतावर पेटोल टाकून पेटवून देवून त्याचे प्रेत विहीरीमध्ये

ढकलून देवुन खुनाचा पुरावा नाहीसा करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगीतले तसेच त्याचा एक साथिदार साखरवाडी ता. फलटण येथील

व इतर २ साथीदार हे सध्या पुणे येथे राहत असलेचे सांगीतल्याने सदरची माहिती श्री. तुषार दोशी, पोलीस अधीक्षक सातारा यांना

देवुन त्यांचे आदेशाप्रमाणे व मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस ठाणेकडील सपोनि शिवाजी जायपत्रे यांना साखरवाडी येथील आरोपीस

ताब्यात घेण्यास सांगीतले. त्याप्रमाणे सपोनि जायपत्रे यांचे पथकाने साखरवाडी येथील आरोपीस ताब्यात घेतले तसेच स्थानिक गुन्हे

शाखा व लोणंद पोलीस ठाणेकडील संयुक्त पथकाने गुन्हयातील इतर २ आरोपींना पुणे येथुन ताब्यात घेतले आहे.

घटनाठिकाणी आरोपींनी कोणतेही पुरावे ठेवले नसताना व मयताची ओळख मिटवण्याचा व गुन्हयाचा पुरावा नाहीसा

करण्याचा प्रयत्न केला असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदरचा संवेदनशील गुन्हा आपल्याकडील तपास कौशल्याचा

वापर करुन केवळ ७२ तासामध्ये उघडकीस आणून उल्लेखनिय कामगिरी केल्याबाबत पोलीस अधीक्षक सातारा तसेच अपर

पोलीस अधीक्षक सातारा यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

श्री. तुषार दोशी, पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे

मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, शिवाजी जायपत्रे, रोहित फार्णे, पो.उ.नि.

विश्वास शिंगाडे, पारीतोष दातीर, रोहित हेगडे पोलीस अंमलदार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ संकपाळ, आतिश घाडगे,

संतोष सपकाळ, विजय कांबळे, संजय शिर्के, शरद बेबले, प्रविण फडतरे, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, अमित झेंडे, मनोज

जाधव, हसन तडवी, स्वप्नील कुंभार, स्वप्नील शिंदे, पृथ्वीराज जाधव, धीरज महाडीक, विशाल पवार, रोहित निकम, अमृत कर्पे,

पंकज बेसके, विजय निकम, आनंदा भोये, लोणंद पोलीस ठाण्याकडील पोलीस अंमलदार विजय पिसाळ, विष्णू धुमाळ, नितीन

भोसले, सतिश दडस, बापुराव मदने, अंकुश कोळेकर, अवधुत धुमाळ, अमोल जाधव यांनी सदरची कामगिरी केली आहे.

Post a Comment

0 Comments