सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
फलटणचा जिल्हा परिषद व पंचायत समितीचा सरकारनामा उद्या जाहीर होणार.
फलटण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या उमेदवारांचे भवितव्य उद्या ठरणार.८ जिल्हा परिषद गटाचे व १६ पंचायत समिती गणाचे निकालाचे कल उद्या सकाळी १० वाजल्यापासून येण्यास सुरुवात होणार फलटण तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ चे निकालाची उत्सुकता लागली असून उमेदवारांची निवड वाढली असून उद्याचा दिवस सूर्योदय कोणासाठी व सूर्यास्त कोणासाठी असणार..!
उद्या सकाळी १० वाजल्यापासून १६ टेबल वरती एकाच वेळी मतमोजणी सुरू होणार दुपारपर्यंत सर्व निकाल स्पष्ट होतील. फलटण तालुक्यातील जिल्हा परिषदेतील ८ गटांमधील व १६ पंचायत समिती गणांमधील निकालाच्या निकषावरती स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीतील धुरंदर ठरेल..!
फलटण तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अटीतटीच्या अत्यंत चुरशीची लढाईमध्ये कोण बाजी मारणार याच्याकडे संपुर्ण सातारा जिल्हाचे लक्ष केंद्रित झाले आहे.
सत्ताधाऱ्यांचे पारडे जड असेल की सत्तेच्या बाहेर राहून संघर्ष केलेल्यांना न्याय मिळेल.परंतु सातारा जिल्हा परिषदेवर झेंडा कुणाचा लागणार..? पालकमंत्री शंभुराज देसाई यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.सातारा जिल्हा परिषदेत महायुती की फक्त भाजप हे उद्याच्या निर्णायक निकालच ठरवेल.

Post a Comment
0 Comments