सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
सोनवडी खुर्द येथे कृषीदुतांनी शेतकऱ्यांना करून दिली शेतमाल खरेदी-विक्री बद्दलच्या आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख.
सोनवडी खुर्द,ता. फलटण येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचे संलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कृषी महाविद्यालय फलटण मधील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२५-२६ कार्यक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना करून दिली शेतमाल खरेदी-विक्री बद्दलच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती.
शेतकऱ्यांना पिकवलेला शेतीमाल विक्री करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते तसेच विक्रीची कला आणि वेळ नसल्याने दर्जेदार शेतीमाल असतानाही शेतकऱ्यांना अपेक्षित फायदा होत नाही. ही समस्या दूर करण्यासाठी शेतमाल विक्रीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची गरज भासते त्या साठी ॲप्स उपलब्ध आहेत. शेतमाल विक्री करू शकतात,तसेच विविध बाजारपेठांचा बाजारभाव ची माहिती, हवामान अंदाज, बियाणे,याबद्दल माहिती मिळवू शकतात कृषीदुतांनी शेतकऱ्यानं या बद्दल मार्गदर्शन केले तसेच यासंबंधित ॲप्सचे महत्त्व सांगितले.भारत ॲग्री,एजी मार्ट, बायर फार्म राईज,ॲनीमाॅल ॲप,बिग हॅट ॲप हे ॲप्स डाऊनलोड करून ते कसे वापरतात याचे प्रात्यक्षिक दाखवले. यावेळी शेतकरी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर,कार्यक्रम समन्वयक प्रा. एन. एस. धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एम. साळुंखे, प्रा. एन. ए. पंडित, प्रा. जी .बी.अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदूत आदित्य कणसे, आदित्य साबळे, कुणाल काशिद, ऋतुराज पाटील, रोहित वाबळे, विश्वजीत साळुंखे, सोमनाथ ढोपे यांनी यावेळी हे प्रात्यक्षिक करून दाखवले.

Post a Comment
0 Comments