सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
इलेक्ट्रीक मोटर चोरी करणारी टोळीला उंब्रज पोलीसांनी केले जेरबंद.
पाण्यातील इलेक्ट्रीक मोटर चोरी करणारे आरोपींना ताब्यात घेवून १,६२,०००/- मुद्देमाल
हस्तगत उंब्रज पोलीस स्टेशनची उल्लेखनीय कामगिरी
मौजे हनुमानवाडी ता. कराड गावचे हद्दीत दिनांक १२/०२/२०२६ रोजी रात्री ०७.३० वा. ते ०८.३०
वा. दरम्यान श्री. सुनिल श्रीरंग अर्जुगडे रा. हनुमानवाडी ता. कराड यांची घराचे पाठीमागे ठेवलेली बिकन कंपनीची
पाण्याची इलेक्ट्रीक मोटर ही अज्ञात आरोपीने चोरुन नेहले बाबत उंब्रज पोलीस स्टेशनला गु.र.नं ४७/२०२६ भा.न्या.सं
कलम ३०३(२) प्रमाणे दाखल करणेत आला होता.
श्री. पंकज पवार सहा. पोलीस निरीक्षक, उंब्रज पोलीस स्टेशन यांनी पोलीस स्टेशन मधील पोलीस
अंमलदार पो. हवा. ब. नं. १४५४ पवार, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पो. हवा. १३२१ धुमाळ, पो. कॉ. ८८७ शिंदे, पो.
कॉ. २३६६ कोळी यांना उंब्रज पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलींग करुन अज्ञात आरोपीचा व पाण्याची इलेक्ट्रीक
मोटरीचा शोध घेवून सदर गुन्हा ओपन करणे बाबत सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे पोलीस स्टाफ हे उंब्रज पोलीस
स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलींग करीत असताना मौजे उंब्रज ता. कराड गावचे हद्दीत पाटण तिकाटणे येथे एक भगव्या रंगाचे
टाटा कंपनी चार चाकी वाहन क्र. एम एच ०९ एम ५९५२ हे वाहन संशयीत रित्या मिळून आल्याने त्याची पाहणी
करीता त्यामध्ये एक पाण्यातील इलेक्टीक मोटर मिळून आल्याने त्या बाबत वाहन चालक निवास संभाजी घाडगे, त्याचे
सोबत असणारा सुरज संजय शेळके दोघे रा. लक्ष्मीनगर, उंब्रज ता. कराड यांना सदर मोटरी बाबत विचारपुस करता ते
उडवाउडवीची उत्तरे देत असलेने त्यांना सदर वाहनासह उंब्रज पोलीस स्टेशन मध्ये घेवून आले. त्यावेळी वरील दोघांना
विश्वासत घेवून विचारपुस करता त्यांनी सांगितले की, हनुमानवाडी ता. कराड येथून एका घराचे पाठीमागून आम्ही
पाण्यातील इलेक्ट्रीक मोटर चोरुन आणली आहे असे सांगितलने. सदर गुन्ह्यातील फिर्यादी यांना सदर मोटर दाखविली
असता त्यांनी ओळखली आहे. करीता इसम नामे निवास संभाजी घाडगे, व सुरज संजय शेळके दोघे रा. लक्ष्मीनगर,
उंब्रज ता. कराड यांचे ताब्यात पाण्यातील इलेक्ट्रीक मोटर व टाटा कंपनी चार चाकी वाहन क्र. एम एच ०९ एम
५९५२ हे गुन्ह्याचे तपास कामी ताब्यात घेवून १,६२,०००/- रुपयेचा मुद्देमाल हस्तगत करणेत आलेला आहे.
सदरची कारवाई मा. श्री. तुषार दोशी, पोलीस अधीक्षक, सो सातारा, मा.डॉ. वैशाली कडूकर, अपर पोलीस
अधिक्षक सो सातारा, मा.राजश्री पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी साो, कराड, यांचे मार्गदर्शनाखाली श्री. पंकज
पवार, सहा. पोलीस निरीक्षक, संजय धुमाळ पो. हवा, युवराज पवार पो.हवा, विकास शिंदे पो. कॉ, राजकुमार कोळी,
पो. कॉ. यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास युवराज पवार पो.हवा. हे करीत आहेत.

Post a Comment
0 Comments