Type Here to Get Search Results !

साखरवाडी शिक्षण संस्थेकडून इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांना शुभेच्छापर निरोप समारंभ.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

साखरवाडी/ हरिदास सावंत (सर) 

साखरवाडी शिक्षण संस्थेकडून इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांना शुभेच्छापर निरोप समारंभ.




साखरवाडी शिक्षण संस्थेच्या इयता दहावी मधील शालांत परीक्षा फेब्रुवारी २०२६ साठी परीक्षार्थी विद्यार्थी विद्यार्थिनींना शुभेच्छा पर निरोप समारंभ नुकताच विद्यालयात संपन्न झाला.संस्थेचे संचालक माननीय श्री माणिक आप्पा भोसले यांचे प्रमुख उपस्थितीत अत्यंत आनंदी वातावरणात झालेल्या या कार्यक्रमात संस्था सचिव तथा माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ उर्मिलाताई जगदाळे , वरिष्ठ शिक्षक श्री  विलास जाधव , सौ वंदना भोसले , सौ छाया पिंगळे , श्री मिलिंद फडतरे , श्री अमोद प्रभाळे इत्यादींनी विद्यार्थ्यांना  मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. विद्यालयातील प्रशम दोषी , प्रज्ञा पवार , गायत्री भोसले , ज्ञानेश्वरी फडतरे , स्वामींनी सरगर , दुर्वा कदम , वैभवी माने इत्यादी विद्यार्थी विद्यार्थिनींनी मनोगते व्यक्त करून आपल्या मित्र मैत्रीणीना शुभेच्छा दिल्या. माननीय श्री माणिक आप्पा भोसले यांनीही आपल्या भाषणात शुभेच्छा दिल्या.संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री प्रल्हादरावजी साळुंखे पाटील , संस्था अध्यक्ष माननीय श्री धनंजय दादा साळुंखे पाटील , संस्था संचालक माननीय श्री राजेंद्र शेवाळे व श्री राजेंद्र भोसले यांनी दूरध्वनीवरून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. संस्थेच्या बालक मंदिर पासून १० वी पर्यंत सुमारे ११ /१२ वर्षे संस्थेच्या विविध विद्यालयांमधून उत्तम प्रकारचे शिक्षण घेवून आपल्या पुढील शिक्षणासाठी जात असलेले सर्वच विद्यार्थी यावेळी भावनिक झालेले दिसून आले. संस्थेच्या वतीने सर्वांना नाष्टा चहापान देवून गोड निरोप देण्यात आला.विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी यावेळी उपस्थित होते.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील सहाय्यक शिक्षक श्री नितीन शिंदे सरांनी केले. श्री सुनील भोसले सरांनी सर्वांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली.

Post a Comment

0 Comments