सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
मोटारसायकल चोरी करणाऱ्या चोरट्यास लोणंद पोलिसांनी केले जेरबंद.
लोणंद बाजार समितीचे आवारात मोटरसायकल चोरी करणा-या चोरटयास लोणंद पोलीसांनी शिताफिने पकडले.
दि. 13.02.2026 रोजी सकाळी 10.00 वा. ते 12.00 वा. चे सुमारास लोणंद ता. खंडाळा गावी बाजार समितीचे आवारात आनंद काळुराम बालगुडे रा. मुढाळे ता. बारामती यांनी त्यांची हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल क्र. एमएच 42 एक्स 3957 ही कांदा मार्केट चे गेट जवळ लावलेली असताना
चोरटयाने चोरुन नेली त्याबाबत आनंद काळुराम बालगुडे यांनी लोणंद पोलीस स्टेशनला तक्रार दिली.
त्यानंतर लोणंद पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस शिवाजी जायपत्रे यांनी मिळाले माहितीचे व
चोरटयाचे वर्णनाचे आधारे डीबी पथकाला सुचना देवुन लोणंद परिसरात सीसीटीव्हीची पाहणी करुन एका
संशयीत इसमाला ताब्यात घेतले त्याचेकडे सखोल चौकशी केलेवर बाजार समितीचे आवारात वरील वर्णणाची मोटरसायकल चोरली असल्याची कबुलीआरोपी हणुमंत भुजंग चव्हाण वय 26 वर्षे रा. बुद्रुकवाडी ता माढा जि सोलापुर याने दिली असुन सदर आरोपी हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असुन
त्याचेकडुन तपासादरम्यान चोरीच्या तीन मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
मा. पोलीस अधीक्षक सातारा, मा. अपर पोलीस अधिक्षक सातारा, मा. उपविभागीय पोलीस
अधिकारी, फलटण विभाग यांचे मार्गदर्शनाखाली लोणदं पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक, श्री.
शिवाजी जायपत्रे, पोउनि हेगडे पोहवा सपोफौ पिसाळ, धुमाळ, भोसले 473, पो. ना. मदने 1151,पो कॉ धुमाळ
537, पो कॉ 1550 कोळेकर, पो कॉ 506 जाधव, म पो कॉ 1192 कापसे यांनी कारवाईत सहभाग घेतला
असुन गुन्हयाचा तपास पोहवा बी. डी. मदने पो.ना 1151 हे करीत आहेत.

Post a Comment
0 Comments