सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
राजधानी सातारा येथे मुधोजी महाविद्यालयाची शिवजयंती साजरी.
दि. १९ फेब्रुवारी २०२६ मुधोजी महाविद्यालयाने राज्य व केंद्र सरकारच्या आदेशाप्रमाणे सातारा या ठिकाणी पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून व अभिवादन करून शिवजयंती केली साजरी. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील महाविद्यालयाने विविध उपक्रमाद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली. यावर्षी महाविद्यालयाने राष्ट्रीय सेवा योजना व एन.सी.सी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सकाळपासून विद्यार्थ्यांनी रांगोळी, फेटे, व महाविद्यालयात झेंडे लावून कार्यक्रमाची तयारी केली होती. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने केली. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुधोजी कनिष्ठ महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी श्री. शंभूराजे नाईक निंबाळकर यांनी करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. यानंतर सर्व मान्यवरांचे बुके व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर एनसीसी विभागाच्या कॅडेट कु.अनुजा धुमाळ, कु.जाधव पायल व कु.जाधव प्रतीक्षा या विद्यार्थिनींनी छत्रपती शिवाजी महाराज व आत्ताच्या तरुणाईच्या वास्तविकतेवर अतिशय सुंदर भाषणे केली. यानंतर इतिहास विभागाच्या डॉ. योगिता मठपती व डॉ अनिल टिके. यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरती व त्यांच्या कार्यावरती विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. यानंतर आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्यांनी आपल्या देशामध्ये वाढत चाललेले गुन्हे, व त्याकरिता निर्माण केलेले अतिरिक्त पोलीस स्टेशन व न्यायालये का उभारावी लागतात.? जर आपण सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार युवकांमध्ये रुजवले असते तर, महाराष्ट्रावर किंबहुना देशावर ही वेळ आली नसती असे प्रतिपादन त्यांनी केले. यानंतर एनसीसी विभागाच्या ले. लीना शिंदे यांनी आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली. यानंतर राष्ट्रीय सेवा योजना व एनसीसी विभाग यांच्या वतीने रॅलीचे उत्स्फूर्तपणे आयोजन करण्यात आले. सातारा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून. घोषणा देण्यात आल्या. या कार्यक्रमासाठी आय क्यू ए सी विभागाचे प्रमुख डॉ. टी.पी.शिंदे, इतिहास विभागाचे ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. अनिल टिके, एन एस एस विभागाचे कार्यक्रम अधिकारी श्री फिरोज शेख व प्रशांत शेट्ये. सर्व विषयाचे विभाग प्रमुख, कनिष्ठ महाविद्यालयाचा प्राध्यापक वृंद, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, एन.सी.सी. कॅडेट, प्रशासकीय कर्मचारी व सेवक उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments