Type Here to Get Search Results !

इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांची एस.एस.सी बोर्ड परीक्षा- २०२६ साखरवाडी केंद्रावर शांततेत सुरू.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांची एस.एस.सी बोर्ड परीक्षा- २०२६ साखरवाडी केंद्रावर शांततेत सुरू.




साखरवाडी - एसएससी बोर्ड केंद्र क्रमांक १००५ , सरदार वल्लभभाई हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज एच एस सी होकेशनल विभाग साखरवाडी व उपकेंद्र साखरवाडी विद्यालय साखरवाडी येथे आज शुक्रवार , दि. २०/०२/२०२६ रोजी दहावीच्या विद्यार्थ्यांची एसएससी बोर्ड परीक्षा शांततेत व उत्साही वातावरणात सुरू झाली. या केंद्रावर एकूण ४४७ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून या केंद्राचे संचालक  प्राचार्य , जाधव जी ए  ,  उपसंचालक  टिळेकर आर एन व  लांडगे एम बी. यांची एसएससी बोर्डातर्फे नियुक्ती करण्यात आली आहे. 

परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी दक्षता समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीमध्ये समितीचे अध्यक्ष बापूसाहेब नाईक निंबाळकर व्हाईस चेअरमन स्कूल कमिटी , तसेच समिती सदस्य  अपर्णा  दत्तात्रय बोडरे सरपंच पिंपळवाडी ग्रामपंचायत , हेमंत सतीश भोसले , ओम मच्छिंद्र भोसले , विशाल आनंदराव भोसले , शंकराव गुजाबा माडकर ,  रमेश कुचेकर ,ग्रामविकास अधिकारी  महादेव आढाव  , तलाठी  काळे   ,  डॉक्टर सोडमिसे प्राथमिक आरोग्य केंद्र साखरवाडी , साखरवाडी दूरक्षेत्र अधिकारी पीएसआय नागवडे मॅडम  , पोलीस पाटील  सोनाली सचिन पवार  यांचा समावेश आहे. दक्षता समिती तर्फे परीक्षेच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला.  परीक्षा सुरक्षित वातावरणात पार पडण्यासाठी सर्व परीक्षा हॉलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments