सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
जबरी चोरीचा गुन्हा आठ तासात उघड, रहीमतपुर पोलीसांची दमदार कामगिरी.
आरोपीकडुन दोन लाख सत्तर हजार रुपये किंमतीचा सोन्याचा मुद्देमाल जप्त
रहिमतपुर पोलीस स्टेशनची सुपर फास्ट उल्लेखनिय कामगिरी
दि.21/2/2026 रोजी फिर्यादी नामे अजय विठठल गाडे, वय-37वर्ष, रा. वडुज रोड माळावर रहिमतपुर ता. जि. सातारा हे आपले दुचाकीरवरुन रहिमतपुर ते कोरेगांव असे जात असताना रोडमध्ये एक अज्ञात इसमाने फिर्यादी यांना लिप्ट मागुन त्याचे सोबत कोरेगांव येथे गेले. दरम्यान अज्ञात इसमाने ओळख वाढवुन कोरेगांव येथील काम झाल्यावर मला देखील रहिमतपुर येथे परत जायाचे आहे आपण सोबत जावु यावर फिर्यादी यांनी होकार दिल्यावर कोरेगांव येथील काम आटपुन फिर्यादी व अज्ञात इसम कोरेगावं येथुन रहिमतपुर येथे येत असताना मौजे दुघी ता कोरेगावच्या हद्दीत रस्त्यावर पुलाचे काम चालु असणा-या निर्जन ठिकाणी लघुशंकेचे बहाण्याने गाडी थाबवुन लिप्ट मागनाऱ्या अनोळखी इसमाने अचानक फिर्यादी यांना लाथाबुक्यानी मारहाण करुन जखमी केले व त्याचे गळ्यातील सुमारे 2,69,132/- एवढया किंमतीची 16.9 ग्रॅम वजनाची एक सोन्याची चैन जबरी चोरी करुन पळुन गेला होता.
सदर घटनेच्या अनुशंगाने फिर्यादी यांनी दिले फिर्यादीवरुन रहिमतपुर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं.20/2026 भारतीय न्याय संहिता कलम 309 (6) अन्वये दि. 22/02/2026 रोजी 00.18 वा जबरी चोरीचा गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात आला.
सदर गंभीर स्वरुपाचे गुन्हा उघड करणेबाबत मा. पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर,मा.उपविभागीय पोलीस अधिकारी कोरेगांव श्रीमती. राजश्री तेरणी यांनी सदर गंभीर गुन्हाचा व अज्ञात
आरोपीत याचा शोध घेणेबाबत सपोनि. श्री. विनोद नेवसे, प्रभारी अधिकारी रहिमतपुर पोलीस ठाणे यांना आदेशीत
केले होते. त्याप्रमाणे सदर गंभीर स्वरुपाचे गुन्हयाचा व गुन्हयातील अज्ञात चोरटयाचा शोध घेणेबाबत मा. सहा. पोलीस निरीक्षक श्री. विनोद नेवसे यांनी सर्व अधिकारी व अंमलदार यांना सुचना दिल्या होत्या त्याप्रामणे पोलीस ठाणे कडील नेमणुकी अधिकारी व अंमलदार यांची दोन पथके तयार करुन गंभीर स्वरुपाचे गुनहयातील अज्ञात आरोपीत याचा शोध घेणेबाबत रवाना केले होते.
सदर गुन्हयाचे तपासादरम्याने पो.कॉ / 1531 महेश देशमुख यांनी तात्रीक विशलेषण व सी.सी.टी.व्ही फुटेज यांचे आधारे सदर गुन्हयातील आरोपी निष्पन्न् करुन त्याचा शोध घेतला असता तो मिळुन आला. आरोपीत याचेकडे सदर गुन्हयाचे अनुशंगाने विचापुस करता तो असमाधानकारक व उडवा उडवीची उत्तरे दिली. म्हणुन त्यास अधिक चौकशी कामी पोलीस ठाण्यात घेवुन आले. तपासादरम्यान तपास कौशल्या वापरल्यावर सदर आरोपीत याने गुन्हयाची कबुली दिली. त्यानंतर त्याचेकडुन गुन्हयातील चोरीस गेलेली वरील वर्णनाची 2,69, 132/- एवढया किंमतीची सोन्याची चैन जप्त करण्यात आलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. गंगाप्रसाद केद्रे हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोषी, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. वैशाली कडुकर,
मा.उपविभागीय पोलीस अधिकारी कोरेगांव श्रीमती राजश्री तेरणी, यांचे मार्गदर्शनाखाली रहिमतपुर पोलीस ठाणे प्रभारी
सहा. पोलीस निरीक्षक श्री. विनोद नेवसे, पोलीस उपनिरीक्षक श्री. गंगाप्रसाद केंद्रे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन माने,प्रविण बर्गे, पोलीस नाईक सुशांत शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल महेश देशमुख, दिपक देशमुख, तुषार काळंगे यांचे पथकाने
सहभाग घेवून सदरची कारवाई केलेली आहे. सदर कारवाई बाबत मा. पोलीस अधीक्षक सो, सातारा यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment
0 Comments