Type Here to Get Search Results !

कृषी तंत्र निकेतन खंडाळाचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न....

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

कृषी तंत्र निकेतन खंडाळाचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न....


खंडाळा विभाग शिक्षण समिती खंडाळा संचलित रामचंद्र धोंडिबा खंडागळे कृषी तंत्र निकेतन खंडाळा ता. खंडाळा जि.सातारा या विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन,कृषी विज्ञान प्रदर्शन व पारितोषिक वितरण समारंभ सोमवार दि. 23 फेब्रुवारी 2026 रोजी अत्यंत उत्साहात पार पडले या समारंभाचे प्रमुख पाहुणे  मा. श्री शिवाजी कुपते ऑपरेटिंग मॅनेजर टी. ई. कनेक्टिव्हिटी प्रा. लि. इंडिया, मा. श्री ऋषिकेश गुमास्ते परचेस मॅनेजर टी. ई. प्रा. लि.इंडिया व श्रीकृष्ण सपकाळ मॅनेजर मेंटेनन्स टी. ई. कनेक्टिव्हिटी प्रा. ली. इंडिया  तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री अनिरुद्ध दादा गाढवे सचिव खंडाळा विभाग शिक्षण समिती खंडाळा , मा. श्री.सुरेश पवार सर उपाध्यक्ष खंडाळा विभाग शिक्षण समिती खंडाळा, मा. श्री बळवंत खंडागळे सभापती शाळा समिती,मा. श्री वसंतराव पंडित, मा. श्री धनंजय फाटक, मा. श्री सावंत एस. आर.संचालक खंडाळा विभाग शिक्षण समिती खंडाळा , मा. श्री सागर खारगे प्राचार्य कृषी तंत्र विद्यालय बोरगाव, मा. श्री जालिंदर माने प्राचार्य कृषि तंत्र निकेतन फलटण इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्रथम विज्ञान कृषी प्रदर्शनाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांचे हस्ते सरस्वती पूजन आणि दिपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर कृषी तंत्र निकेतनचे प्राचार्य मा. श्री धर्मेंद्रकुमार माने सर यांनी उपस्थित मान्यवर आणि विद्यार्थी पालक यांचे स्वागत करून या कृषी तंत्र निकेतनच्या स्थापना आणि आजपर्यंतचा इतिहास याबाबत माहिती दिली. या कृषी तंत्र निकेतन मधून शिक्षण घेऊन आजवर अनेक यशस्वी विद्यार्थ्यांनी विविध शासकीय तसेच खासगी क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवीत महाविद्यालयाचा लौकिक वाढवला असून अनेक विद्यार्थी कृषि व्यवसायात यशस्वी ठरले असल्याचे सांगितले.

प्रमुख पाहुणे मा. श्री ऋषिकेश गुमास्ते यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आपली संगत जर चांगली असेल तर एखादा सर्वसामान्य विद्यार्थी देखील अभ्यासात सातत्य राखत यशस्वी भविष्य घडवू शकतो.तर संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री पवार स. बी. सर यांनी विद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक यांचे कौतुक केले 

तसेच संस्थेचे सचिव मा. श्री अनिरुद्धदादा गाढवे यांनी रामचंद्र धोंडिबा खंडागळे (बापू )यांनी या कृषी तंत्र निकेतन साठी  आपल्या संस्थेस जमीन दिल्यामुळेच आजची ही विद्यालयाची वास्तू उभी राहिली असून गेल्या काही वर्षात शेकडो विद्यार्थी या कृषी तंत्र निकेतन मध्ये शिकून यशस्वी जीवन जगत आहेत.मा. श्री सावंत सर यांनी विद्यार्थ्यांना जीवन जगत असताना ते कसे जगावे या विषयी मार्गदर्शन केले 

प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या विशेष प्राविन्य मिळवलेल्या विध्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा यावेळी मान्यवरांचे हस्ते पार पडला. बक्षीस पारितोषिक वितरणावेळी विद्यार्थ्यांसह पालकांना देखील मंचावर आमंत्रीत करण्यात आल्याने विध्यार्थी आणि पालक दोघांचा आनंद द्विगुणित झाल्याचे पाहायला मिळाले. 

यानंतर विविध गुणदर्शन कार्यक्रमात रामचंद्र धोंडिबा खंडागळे कृषी तंत्र निकेतनच्या विध्यार्थ्यांनी वेगवेगळी कला, गाणी, कविता, नाटकं आदींचे उत्कृष्ट सादरिकरण करून उपस्थितांची मने जिंकली.

जवळपास तीन ते चार तास चाललेल्या या कला गुणदर्शन सोहळ्यात अत्यंत सुंदर नृत्यकला, अभिनय करत तिन्ही वर्ष विध्यार्थी उपस्थितांना खुर्चीला खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरले. तसेच यावेळी खास विध्यार्थी शिक्षक यांचे आग्रहाखातर कृषी तंत्र निकेतन चे प्राध्यापक श्री संकपाळ सर यांनी देखील यावेळी नृत्य सादर करत या कार्यक्रमात रंगत भरली. तसेच प्रथम व तृतीय वर्षातील विद्यार्थिनींनी बाबाची कहाणी या गाण्यावर उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांमध्ये भावनिकतेचे वातावरण तयार केले अतिशय उत्कृष्ट सादरीकरणामुळे पूर्ण विद्यालयाच्या वातावरणात सर्व उपस्थितांचे डोळे पाणवलेले होते.

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन कृषी तंत्र निकेतनच्या प्राध्यापिका राऊत मॅडम यांनी अतिशय नेटके केले. कार्यक्रम शांततेत सुरू राहण्यासाठी प्राध्यापक संकपाळ सर शेती अधिकारी जगताप सर तसेच इतर सर्व विद्यालयातील कर्मचारी यांनी सहकार्य केले 

आभार प्राचार्य  धर्मेंद्रकुमार माने यांनी मानले.

Post a Comment

0 Comments