सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
फलटण ग्रामीण पोलिसांची दमदार कामगिरी, प्रेमाच्या जाळ्यात ओढून युवकाच्या केलेल्या खुनाचा लावला कौशल्यपूर्ण छडा.
पोलीस उपनिरीक्षक दिपक पवार यांनी एकाच महिन्यात तीन गंभीर गुन्ह्याचा केला कौशल्यपूर्ण तपास.
दि. 17/02/2026 रोजी 18.00 वा. चे सुमारास गोखळी, ता. फलटण, जि. सातारा गावचे हद्दीत
निरानदीच्या पात्रात एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत पाण्यावर तरंगत असलेल्या स्थितीत ग्रामस्थांना दिसुन
आल्यानंतर त्याबाबत प्रथम अकस्मात मयत नोंद करण्यात आले होते. त्याचे तपासामध्ये अनोळखी
मृतदेहाची ओळख पटुन ते अंकुश बापू नरबट वय 22 वर्ष, रा. ढाकणी, ता. माण, जि. सातारा याचे
असल्याचे निष्पन्न झाले.
तो माण तालुक्यातील रहिवाशी असताना त्याचा मृतदेह फलटण तालुक्यातील निरानदीच्या पात्रात
कसा मिळुन आला ? याशिवाय प्रेताचे डोक्यावर असणा-या जखमा कशा ? ही शंका पोलीसांना आली.
त्यातच मृत हा स्त्रीलंपट असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावर पोलीस तांत्रिक व गोपनीय माहितीच्या
आधारे मुळापर्यंत गेल्यानंतर असे निष्पन्न झाले, की मृत अंकुश बापू नरबट याने आरोपींच्या कुटूंबातील एका
मुलीबाबत अत्याचाराचा प्रकार केला होता. परंतु आरोपींनी खोट्या प्रतिष्ठेपायी त्याची कोठेही वाच्यता न
करता बदला घेण्यासाठी त्याचा खुन करण्याचा कट केला. त्यानुसार मृतास प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी
स्त्रीच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट उघडुन मृत व्यक्तीस प्रेमाच्या जाळ्यात ओढुन फलटणला
भेटायला बोलाविले.
दि. 15/02/2025 रोजी 12.00 वा. चे सुमारास मृत अंकुश नरबट हा फलटणला आल्यानंतर
आरोपींपैकी एका महिलेने त्यास एकांतात वेळ घालविण्याच्या बहाण्याने निर्जनस्थळ असलेल्या तातमगिरी
डोंगराच्या पायथ्याला नेले. त्याठिकाणी गेल्यानंतर कटानुसार इतर चार आरोपी हे वेगवेगळ्या वाहनातून गेले.
तेथे त्यांनी मृत अंकुश नरबट यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन चारचाकी वाहनामध्ये घालुन पिंप्रद, ता.
फलटण गावचे हद्दीत दुस-या निर्जनस्थळी नेले. त्याठिकाणी त्याचा खुन करुन त्याचे प्रेत पुरावा नाहीसा
करण्याच्या उद्देशाने गोखळी गावचे हद्दीत निरानदीच्या पात्रात टाकुन दिले. हा प्रकार निष्पन्न झाल्यानंतर
फलटण ग्रामीण पोलीस ठाणे, गु. र. नं. 119/2026, भा. न्या. सं. 2023 चे कलम 103 (1), 140 (1), 238, 61,
3(5) अन्वये खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्याचा तपास पो. उ. नि. दिपक पवार हे करीत असुन
आरोपी 1. आविष्कार ज्ञानेश्वर भगत 2. श्रद्धा आविष्कार भगत 3. ज्ञानेश्वर भरतराव भगत 4. अर्चना ज्ञानेश्वर
भगत चौघे रा. पिंप्रद, ता. फलटण, जि. सातारा यांना अटक करण्यात आली आहे.
आरोपींनी सदरचा गुन्हा थंड डोक्याने कट करुन केला आहे. यामुळे तपासामध्ये सुरुवातीला
पोलीसांकडे काहीही धागेदोरे नव्हते. परंतु पोलीसांनी अत्यंत मेहनतीने फलटण ते दहिवडी रोडवरील सर्व
हॉटेल, दुधडेअरी व पेट्रोलपंप इत्यादी ठिकाणांवरील सी. सी. टी. व्ही. कॅमेरे तपासले. आरोपी व मृतक यांचे
मोबाईल नंबरची तांत्रिक माहिती प्राप्त केली. त्यातून मिळालेल्या तुटपुंज्या माहितीच्या आधारे कौशल्यपूर्ण
तपास करुन पुराव्याची साखळी जोडुन सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक मा. तुषार दोशी सो, अपर पोलीस अधीक्षक मा. वैशाली कडुकर
मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी मा. विशाल खांबे सो यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप
जगताप यांचे नेतृत्वात गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक दिपक ज्ञानदेव पवार, पोलीस
अमंलदार नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, वैभव सुर्यवंशी, हणमंत दडस यांनी सहभाग घेतला होता.

Post a Comment
0 Comments