Type Here to Get Search Results !

साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभागात राष्ट्रीय विज्ञान दिन संपन्न व विविध कार्यक्रमांचे आयोजन.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

साखरवाडी/ हरिदास सावंत (सर) 

साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभागात राष्ट्रीय विज्ञान दिन संपन्न व विविध कार्यक्रमांचे आयोजन.




साखरवाडी शिक्षण संस्थेच्या साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभागात २८ फेब्रुवारी हा  राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने विद्यालयातील मुलामुलींनी विविध विज्ञान विषयक कार्यक्रम सादर केले.तसेच चित्रकला स्पर्धा , रांगोळी स्पर्धा , निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ उर्मिलाताई जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान विषय प्रमुख सौ ज्योती साळुंखे मॅडम नी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले.वरिष्ठ शिक्षक श्री विलास जाधव सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.सर्व विज्ञान विषय शिक्षकांनी उत्तम सहकार्य केले.आभार श्री संदीप वाघमोडे सरांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments