Type Here to Get Search Results !

उमेद अंतर्गत विभागीय,जिल्हास्तरीय आणि मिनी सरसच्या प्रदर्शनातून बचत गटांना तब्बल 1,15,06,483 रुपयांची कमाई..

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

उमेद अंतर्गत विभागीय,जिल्हास्तरीय आणि मिनी सरसच्या प्रदर्शनातून बचत गटांना तब्बल 1,15,06,483 रुपयांची कमाई.





1)विभागीय,मिनी व जिल्हास्तरीय सरस स्वयंसहाय्यता समूहांची उत्पादने विक्री व प्रदर्शनातून बचत गटांना कोटीची बक्कळ कमाई!


2)उमेद विभागीय प्रदर्शनाद्वारे महिलांना मिळाली आत्मनिर्भरतेची संधी.......

छत्रपती संभाजीनगर (रविवार, दिनांक 01 मार्च 2026)

उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, अंतर्गत विभागीय,जिल्हास्तरीय आणि मिनी सरसच्या प्रदर्शनातून बचत गटांना तब्बल 1,15,06,483 रुपयांची कमाई झाली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक मा. श्री अशोक शिरसे यांनी दिली.


दि.25 फेब्रुवारी 2026 ते 01 मार्च 2026 या कालावधीत बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन जिल्हा परिषदेच्या मैदानावर भरविण्यात आले होते.मा.श्री जितेंद्र पापळकर, विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय, मा. श्री दिलीप स्वामी जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजी नगर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक शिरसे, श्रीमती सुषमा देसाई आप्पर आयुक्त (विकास )अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके,प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राघवेंद्र घोरपडे, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ ओमप्रकाश रामावत यांच्यासह सर्व विभाग प्रमुख तसेच अधिकारी,कर्मचारी यांच्या सहकार्यातून यावर्षी बचत गटांनी कोटीत भरारी घेतली.

यामध्ये खानावळीचे 25 तर 182 इतर वस्तू विक्रीचे एकूण 207 समूहाणी सहभाग नोंदविला..

 विभागामधून प्रथम उडान महिला स्वयं सहायता समूह बीड, द्वितीय सह्याद्री समूह लातूर तृतीय वैष्णवी समूह नांदेड तसेच छत्रपती संभाजी नगर जिल्हा मधून प्रथम अण्णाभाऊ साठे वैजापूर द्वितीय राणीलक्ष्मीबाई खुलताबाद तर तृतीय भीमशक्ती वैजापूर यांनी वस्तू उत्पादन विक्रमी विक्री करून पटाकावळे.. तर खाद्यपदार्थ मेजवानी मधून प्रथम राधाकृष्ण समूह गंगापूर, द्वितीय समर्थ समूह सोयगाव तर तृतिय जय सेवालाल समूह पैठण यांनी पटकवीला...

या पाच दिवसीय कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक प्रकल्प संचालक उल्हास खळेगावकर,उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक विक्रम सरगर,लेखाधिकारी यशवंत शिंदे, जिल्हा व्यवस्थापक सचिन सोनवणे, बिबीशन भोईटे,प्रज्ञा दाभाडे,सुचिता खोतकर  यांच्यासह जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सर्व अधिकारी कर्मचारी व तालुकास्तरावरील तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक सर्व, प्रभागसमन्वयक, पशु व कृषी व्यवस्थापक, व सर्व ग्रामसखी ताई इत्यादीनी सर्वोतपरी मेहनत घेतली.

Post a Comment

0 Comments