Type Here to Get Search Results !

ग. वि. भोसले प्रतिष्ठान - साखरवाडी मार्फत जागतिक महिला दिनानिमित्त खास महिला भगिनींसाठी भव्य निबंध स्पर्धा व सत्काराचे आयोजन:

सह्याद्री निर्भिड न्यूज 

साखरवाडी हरिदास सावंत (सर) 

ग.वि.भोसले प्रतिष्ठान - साखरवाडी मार्फत  जागतिक महिला दिनानिमित्त खास महिला भगिनींसाठी भव्य निबंध स्पर्धा व सत्काराचे आयोजन.




साखरवाडी ता. फलटण,जि. सातारा येथील श्री गणपत विठ्ठल भोसले प्रतिष्ठान ने ८ मार्च या जागतिक महिला दिनानिमित्त खास महिला भगिनिंसाठी भव्य निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे.स्पर्धेसाठी " अनाथांची माय सिंधुताय...सिंधुताई सपकाळ एक संघर्ष यात्री" हा विषय देण्यात आला असून शब्द मर्यादा ७०० शब्दांची आहे. विजेत्या प्रथम क्रमांकाचे बक्षीस रोख रुपये ३५०१/- , द्वितीय क्रमांकाचे बक्षीस रोख रुपये २५०१/- व तृतीय क्रमांकाचे बक्षीस रोख रुपये १५०१/- असून सोबत आकर्षक स्मृतिचिन्ह दिले जाणार आहे.याशिवाय सहभागी सर्व महिला भगिनींना महिला दिनानिमित्त सन्मानित करण्यात येणार आहे.या स्पर्धा जागतिक महिला दिनी ८ मार्च रोजी साखरवाडी येथील श्री भवानीमाता मंदिरात  सकाळी दहा ते अकरा या वेळेत संपन्न होतील असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री सचिन गणपतराव भोसले , उपाध्यक्ष श्री संजय गणपतराव भोसले व सचिव श्री हरिदास सावंत सर यांनी कळवले आहे.स्पर्धेचे आखीव कागद प्रतिष्ठान कडून दिले जातील.प्रवेश विनामूल्य असून जास्तीत जास्त महिला भगिनींनी स्पर्धेत सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे 

अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी ९६८९८६८२३३  , ९८९०४२०५२० किंवा ९४२३२३२३१५ या भ्रमण ध्वनी वर संपर्क साधून प्रवेश निश्चित करावा असे सचिव श्री हरिदास सावंत सर यांनी कळवले आहे.

Post a Comment

0 Comments