सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
तरडगाव येथे शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ श्रीमंत रामराजे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरा सभा पार पडली.
तरडगाव ता.फलटण येथे तरडगाव जिल्हा परिषद गटाचे शिवसेनेचे उमेदवार श्री.गिरीश सुदाम बनकर, तरडगाव पंचायत समिती गणाच्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार सौ.योगिता दिपक गायकवाड, पाडेगाव पंचायत समिती गणाचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार श्री.राहुल दादासो नरुटे यांच्या प्रचारार्थ श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरा सभा आयोजित करण्यात आली होती.
धरणच मी बांधले नसते तर पाईप लाईनने पाणी आणले असते कुठून ..?-श्रीमंत रामराजे
या वेळी बोलत असताना श्रीमंत रामराजे म्हणाले की विरोधक म्हणतात ३०-३५ वर्षात रामराजेंनी काय केले.? मला त्यांना विचारायचे तुम्ही खासदार असताना काय केले.? मी नीरा देवधर धोम, बलकवडी सारखी धरणे बांधली शेतकऱ्यांच्या शिवारात पाणी आणले ज्या भागात धरणे बांधली त्या भागातील लोकांचे पुनर्वसन करताना मला किती त्रास झाला आहे हे फक्त मलाच माहित आहे त्यावेळी तुम्ही कुठे गेलता.? मी आणलेल्या पाण्यावरच तुम्ही तुमचा स्वराज कारखाना उभा केला आहे हे विसरू नका..! निरा देवधरचे काम अपूर्ण राहिले त्यावेळेस अनुशेषचा विषय आला होता तुमच्या जर ताकत असेल तर अनुशेष हा शब्दच व त्याचे कलम कायद्यातून रद्द करून दाखवा. आज जे पाईपलाईन पाणी आणल्याचे जे दाखवले जाते ना ते माझ्यामुळे हे विसरू नका कारण..
कुणाच्याही दहशतीला बळी पडू नका...
आम्ही दडपशाहीचे व दहशतीचे राजकारण कधी केले नाही आम्ही फक्त विकासाचे राजकारण केलेले आहे. लोकांना अडचणीमध्ये आणुन आम्ही कधी प्रवेश घेतलेले नाहीत आणि घेणारही नाही.
कारखाना कसा बुडवायचा हे फक्त शिकावे प्रल्हाद पाटलाकडूनच.. श्रीमंत रामराजे
साखरवाडीचा कारखाना आख्खा गिळून टाकला. यामुळे कामगार आणि शेतकरी देशोधडीला लावले आणि आज तोच कारखान्याला मी ऊर्जितावस्थेत आणला तो कारखाना उत्तम प्रकारे चालला असून त्यात सुद्धा राजकारणाचा प्रयत्न केला जात आहे. कमिन्स सारखी मल्टिनॅशनल कंपनी येथे आणली कंपनी व्यवस्थित चालली असताना कंपनीला टाळे ठोकायची यांची भाषा.. अरे... याच कमिन्स कंपनीचा थोड्याच दिवसात आणखी विस्तार झालेला तुम्हाला पाहायला मिळेल आणखी तालुक्यातील माझ्या हजारो तरुणांना रोजगार मिळेल हे माझे प्रयत्न चालू आहेत आणि ते मी करणारच...

Post a Comment
0 Comments