सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
राजेंद्र विद्यालयात महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने महिला सक्षमीकरण कार्यशाळा संपन्न..
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभाग अंतर्गत जिल्हा महिला व बालकल्याण विकास कार्यालय सातारा अंतर्गत जिल्हा महिला सक्षमीकरण केंद्र तसेच सखी वन स्टॉप सेंटर सातारा यांच्या वतीने राजेंद्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खंडाळा येथे महिला व बालकांसाठी विविध शासकीय योजनेची सविस्तर माहिती शासकीय कर्मचाऱ्यांच्या वतीने देण्यात आली. ही माहिती देण्यासाठी सातारा जिल्हा महिला सक्षमीकरण केंद्र विभागाच्या I T Asst श्रीमती रोहिणी जाधव मॅडम वन स्टॉप सेंटर च्या केस वर्कर श्रीमती सलमा मुलाणी तसेच बहुउद्देशीय कर्मचारी श्रीमती नीलम खटावकर मॅडम उपस्थित होते या चर्चासत्रात त्यांनी शी बॉक्स पोर्टल, मिशन शक्ती ॲप, तसेच लाडकी बहीण योजना, बाल संगोपन योजना, child helpline number, बालविवाह प्रतिबंध कायदा, वन स्टॉप सेंटर अशा विविध योजनेची सविस्तर माहिती सर्व महिला कर्मचारी यांना दिली. महिलाचा विविध शंकांची निरसन करण्यात आले. यावेळी या माध्यमातून उपस्थित सर्वांनीच बालविवाह प्रतिबंध शपथ घेतली तसेच हेल्पलाइन नंबरची माहिती देण्यात आली. याप्रसंगी राजेंद्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खंडाळा यांचे प्राचार्य श्री टी जे.खांडे , उपप्राचार्य सौ अरुंधती गाढवे मॅडम, संचालिका सौ चव्हाण मॅडम, उपमुख्याध्यापिका सौ. मोहिते मॅडम तसेच सर्व महिला शिक्षिका, विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक श्रीमती कोंढाळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ गायकवाड एस एस यांनी केले.

Post a Comment
0 Comments