सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
लोणंद -फलटण हायवेवर भिषण तरडगाव नजीक अपघात.
लोणंद -फलटण हायवेवर तरडगाव नजीक ब्रह्मचैतन्य मंगल कार्यालयासमोर ईरटीगा गाडी क्रमांक MH11 DD 9898 या गाडीने बुलेटवर स्वार असणाऱ्या दोन युवकांना जोरदार धडक दिल्याने त्या युवकांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी सातारा येथे पाठविण्यात आले आहे.मिळालेलया माहिती नुसार पुढे चाललेल्या दुचाकीस्वार यांना पाठीमागून आलेल्या ईरटीका या गाडीने पाठीमागून जोरदार धडक दिली.
यामध्ये हे युवकांना गंभीर दुखापत झाली असून हे युवक भोर या ठिकाणचे आहेत व ईरटीका गाडी ही साखरवाडी येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे.या सदर घटनेचा अधिक तपास स.पो.नि.शिवाजी जायपत्रे हे करीत आहेत.

Post a Comment
0 Comments