Type Here to Get Search Results !

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान दुर्घटनेची FIR दाखल नसल्याचे उघड.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान दुर्घटनेची FIR दाखल नसल्याचे उघड.

अजितदादांवर प्रेम करणारे सर्वजण बारामती तालुका पोलीस ठाण्यात उद्या सकाळी ९ वाजता FIR दाखल करण्यासाठी जाणार




अजितदादांच्या विमान अपघाताबाबत योग्य कारवाईची वाट बघत असतानाच काल या अपघातास VSR कंपनीचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा DGCA चा अहवाल आला. परंतु अद्यापही याबाबत कोणताही FIR दाखल करण्यात आला नसल्याने या अहवालाच्या आधारे आ. अमोल मिटकरी, आ. इद्रिस नाईकवडी आणि आ. संदिप क्षीरसागर यांच्यासह मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात जाऊन BNS कायद्यानुसार FIR दाखल करण्याची मागणी केली. त्यानुसार माझा जबाब घेण्यास सुरवातही झाली होती, परंतु त्याचवेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने हा FIR दाखल करुन घेण्यास नकार देत केवळ औपचारिकता पूर्ण करण्यासाठी अर्ज घेतला. 


पोलिसांच्या या कृतीमुळं विमान अपघाताबाबत आम्ही व्यक्त करत असलेला संशय अधिक गडद होत आहे. विरोधी आणि सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींकडून मागणी करुनही पोलिसांकडून FIR दाखल करण्याच्या मागणीला केराची टोपली दाखवली जात असेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. यामुळं सरकार आणि यंत्रणा कुणालातरी वाचवत असल्याचं स्पष्ट दिसत असून हे असंच सुरु राहिलं तर अजितदादांना न्याय मिळेल का? अशी शंका निर्माण होत आहे, परंतु आम्ही मात्र हा विषय तडीस नेल्यावाचून थांबणार नाही. उद्या सकाळी ९ वाजता FIR दाखल करण्यासाठी अजितदादांवर प्रेम करणारे आम्ही सर्वजण बारामती तालुका पोलीस ठाण्यात जाणार आहे.



Post a Comment

0 Comments