Type Here to Get Search Results !

ग. वि . भोसले प्रतिष्ठान - साखरवाडी यांचे वतीने जागतिक महिला दिनी साखरवाडी परिसरातील महिला भगिनींचा साडी श्रीफळ देऊन सत्कार व निबंध स्पर्धेचे आयोजन..

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

साखरवाडी/हरिदास सावंत (सर) 

ग. वि . भोसले प्रतिष्ठान - साखरवाडी यांचे वतीने जागतिक महिला दिनी साखरवाडी परिसरातील महिला भगिनींचा साडी श्रीफळ देऊन सत्कार व निबंध स्पर्धेचे आयोजन..





साखरवाडी ( तालुका फलटण , जिल्हा सातारा) येथील श्री गणपत विठ्ठल भोसले सर प्रतिष्ठानने जागतिक महिला दिनी महिला भगिनींना साडी श्रीफळ देऊन सन्मानित केले.यानिमित्ताने खास महिला भगिनींसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.स्पर्धेसाठी " अनाथांची माय सिंधूताय...सिंधूताई सपकाळ एक संघर्ष यात्री" असा विषय देण्यात आला.परिसरातील सुमारे २० महिला भगिनींनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला.बक्षिसांचे स्वरूप रोख रुपये ३५०१/- , रुपये २५०१/- , रुपये १५०१/- असे असून लवकरच त्याचा बक्षीस वितरण समारंभ आयोजित केला जाईल असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री सचिन गणपतराव देशमुख, उपाध्यक्ष श्री संजय गणपतराव देशमुख आणि सचिव श्री हरिदास दिगंबर सावंत यांनी सांगितले. सत्कार समारंभ प्रतिष्ठानच्या मुख्य विश्वस्त श्रीमती जयश्री गणपतराव भोसले यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.याप्रसंगी सचिव श्री हरिदास सावंत सर तसेच सभासद श्री सुनील शंकरराव भोसले , श्री सचिन दादासाहेब चौगुले व सूरज अनंत गाडे उपस्थित होते.सूत्रसंचालन श्री सचिन चौगुले यांनी केले.श्री हरिदास सावंत व काही स्पर्धक महिलांनी यानिमित्ताने मनोगते व्यक्त करून महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.उपस्थित सर्वांना प्रतिष्ठान मार्फत चहापान देवून कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

0 Comments