Type Here to Get Search Results !

शेतकऱ्यांची ऊस बिले थकीत; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा”

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

शेतकऱ्यांची ऊस बिले थकीत; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा”




हिंगणगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने थकीत ऊस बिलांच्या प्रश्नावर जाहीर सभा घेण्यात आली. स्वराज ऍग्रो उपळवे, शरयू ऍग्रो कापशी आणि किसनवीर युनिट क्रमांक २ म्हावशी या साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांची ऊस बिले मोठ्या प्रमाणात थकीत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

सभेत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, ऊस घातल्यानंतर नियमानुसार १४ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर बिलाची रक्कम जमा होणे आवश्यक आहे. मात्र अनेक दिवस उलटूनही शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे.

यावेळी स्वराज ऍग्रो उपळवे, शरयू ऍग्रो कापशी आणि किसनवीर युनिट क्रमांक २ म्हावशी या कारखान्यांवर ज्यांची ऊस बिले थकीत आहेत अशा शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. ऊस बिले तात्काळ न दिल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

Post a Comment

0 Comments