Type Here to Get Search Results !

साखरवाडीत रात्रीस खेळ चाले...! रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची..!

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

साखरवाडीत रात्रीस खेळ चाले...! रस्त्यांच्या कामात गोलमाल..!




साखरवाडी पिंपळवाडी येथे रस्त्यांच्या कामात गोलमाल चालला असून ही कामे रात्रीच्या अंधारात अतिशय निकृष्ट दर्जाची चालू असुन ठेकेदार हा मनमानी कारभार करत असुन त्यास रस्त्याच्या कामात टक्केवारी मिळालेल्या नेत्याचे अभय असल्याचा आरोप साखरवाडीचे सामाजिक युवा कार्यकर्ते पै.ओंकार भोसले यांनी केला आहे.

फलटण तालुक्याची बारामती करणार असल्याची चुकीची वल्गना करणारे आता का बिळात लपून बसले आहेत.. सत्तेच्या हव्यासापोटी सर्वसामान्य जनतेला वेठीस धरून मते मिळवून निवडून यायचे व परत त्या जनतेला वाऱ्यावर सोडायचे..!

खोटे बोल पण रेटून बोल.. आणि निवडणुकीच्या काळात गाजरांचा पाऊस पाडणाऱ्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधली आहे का..? इथुन पुढे बेरजेचे राजकारण करणाऱ्यांच्या विरोधात जाहीर निषेध व्यक्त करण्यात येईल व जशास तसे उत्तर दिले जाईल..

सत्तेच्या समीकरणासाठी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी व विकास कामांच्या नावाखाली जनतेची दिशाभूल करु नका..नाहीतर एक वेळ अत्यंत चुरशीची येईल.

Post a Comment

0 Comments