Type Here to Get Search Results !

नवोदय परीक्षेत जावली केंद्र शाळेतील विद्यार्थिनी अदिती बजरंग पवारची निवड.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

नवोदय परीक्षेत जावली  केंद्र शाळेतील विद्यार्थिनी अदिती बजरंग पवारची निवड.




 जावली ता. फलटण येथील जिल्हा परिषद शाळेतील  विद्यार्थिनी अदिती बजरंग पवार हिची नवोदय परीक्षेमधून नवोदय विद्यालय सातारा येथे निवड झाली आहे.

तिला वर्गशिक्षक श्री. कल्याण वाघमोडे सर, शाळेचे मुख्याध्यापक श्री. सोनवलकर सर ,जगताप सर गायकवाड सर, ओबासे सर, येळणे मॅडम, काळे मॅडम या सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातील ही विद्यार्थ्यांनी असून आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तिने यश हे यश मिळवले आहे. ती जावली येथील सिद्धनाथाचे सालकरी पुजारी बजरंग पवार यांची कन्या आहे.

तिने मिळविलेल्या या यशाबद्दल जावली गावचे ग्रामस्थ ,नातेवाईक, यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments