सह्याद्री निर्भिड न्यूज
साखरवाडी हरिदास सावंत (सर)
साखरवाडी येथील कुमारी प्रनोती सस्ते यांची महाराष्ट्र बँकेच्या CSA पदावर निवड.
साखरवाडी ता. फलटण , जि. सातारा येथील कुमारी प्रनोती बिंदू नितीन सस्ते यांची IBPS मार्फत 2025 मध्ये घेतल्या गेलेल्या स्पर्धा परीक्षेतून बँक ऑफ महाराष्ट्रच्या CSA ( Customer Service Associate) पदावर अभिनंदनीय निवड झाली आहे.कुमारी सस्ते यांनी २०१७ साली साखरवाडी येथील साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभागातून इयत्ता दहावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे त्यांनी B.sc.पदवी मिळवून स्पर्धा परीक्षेत लक्ष केंद्रित केले.अत्यंत परिश्रमपूर्वक आणि जिद्दीने त्यांनी हे उत्तुंग यश प्राप्त केले आहे.साखरवाडी परिसरातून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या या अभिनंदनीय निवडीचे मन:पूर्वक हार्दिक अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment
0 Comments