Type Here to Get Search Results !

प्रा. जयप्रकाश गेजगे यांचा जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेत गौरव, पटकावला चतुर्थ क्रमांक.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

प्रा. जयप्रकाश गेजगे यांचा जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेत गौरव, पटकावला चतुर्थ क्रमांक. 




 महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यावतीने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेत खंडाळा येथील राजेंद्र उच्च माध्यमिक विद्यालयातील प्रा.जयप्रकाश गेजगे यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. त्यांनी रतन टाटा युवा पिढीचा प्रेरणास्त्रोत या उपक्रमाला जिल्ह्यातून चौथा क्रमांक मिळाला आहे. माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी श्री जयप्रकाश गेजगे  यांनी हा उपक्रम राबवला होता.रतन टाटा यांच्या जीवनकार्यातून मुलांना प्रेरणा मिळावी आणि वृत्तपत्रांच्या कात्रणांच्या संकलनातून रतन टाटा यांचे जीवन कार्य विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल याचे प्रभावी सादरीकरण त्यांनी या स्पर्धेत केले होते. 

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था फलटण द्वारे  दिनांक 6 मार्च 2026 रोजी जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेच्या बक्षीस वितरण वितरणाच्या प्रसंगी डाएटचे प्राचार्य श्री जितेंद्र साळुंखे, श्री कृष्णा फडतरे, सौ अन्नपूर्णा माळी मॅडम, डॉ. अमोल डोंबाळे, डॉ. सतीश फरांदे, श्री विजय भिसे हे उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या हस्ते जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था फलटण येथे प्रा.जयप्रकाश गेजगे यांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

 या यशाबद्दल खंडाळा शिक्षण विभाग समितीचे अध्यक्ष शंकरराव गाढवे, उपाध्यक्ष  सुरेश पवार, सचिव अनिरुद्ध गाढवे, राजेंद्र उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य तुळशीराम खांडे,  उपप्राचार्य सौ.अरूंधती गाढवे, उपमुख्याध्यापिका सौ.सुशिला मोहिते, सहकारी शिक्षकांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments