Type Here to Get Search Results !

कु. शिवांजली विक्रमसिंह भोसले यांची सातारा जिल्हा परिषद आरोग्य समिती च्या सदस्य पदी निवड.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

कु. शिवांजली विक्रमसिंह भोसले यांची सातारा जिल्हा परिषद आरोग्य समिती च्या सदस्य पदी निवड.




सातारा जिल्हा परिषद आरोग्य समिती च्या सदस्य पदी फलटण पंचायत समिती सभापती कु. शिवांजली विक्रमसिंह भोसले यांची निवड करण्यात आली.फलटण पंचायत समितीच्या सभापती पदी विराजमान झाल्यानंतर तरुण, उच्च शिक्षित, तडफदार सर्व समाज घटकांना सामावून घेऊन एवढ्या लहान वयात समाजसेवेची असलेली आवड पाहून पक्षश्रेष्ठींनी त्यांची सातारा जिल्हा परिषद आरोग्य समितीच्या सदस्य पदी निवड करण्यात आली.

 सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी नवे उपक्रम राबविण्याच्या अनुषंगाने व ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम व प्रभावी करण्यासाठी, आणि जनतेच्या आरोग्याच्या उन्नतीसाठी मी निश्चितच उत्कृष्ट कार्य करेन अशी त्यांनी ग्वाही दिली.

सातारा जिल्हा परिषद आरोग्य समितीच्या सदस्य पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


Post a Comment

0 Comments