सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
तरडगाव ग्रामपंचायत ग्रंथालयाच्या वतीने,यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांच्या गौरव.
तरडगाव:लिपिक-टंकलेखक, जिल्हा सत्र व दिवाणी न्यायालय,मुंबई शहर- कु.नमिता विलास गायकवाड सत्कार स्वीकारताना.
फलटण : तरडगाव ग्रामपंचायत ग्रंथालयाच्या वतीने, ग्रंथालयात सातत्याने अभ्यास करून उज्ज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांच्या गौरवासाठी आयोजित भव्य सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित म्हणून लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) शिवाजी जायपात्रे साहेब, फलटण कोरेगाव मतदार संघाचे माजी आमदार दीपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषद सदस्य गिरीश बनकर, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती वसंत काका गायकवाड, पंचायत समिती सदस्य योगिता गायकवाड, पंचायत समिती सदस्य राहुल नरुटे, विजय गुळदगड, संदीप कुंभार तसेच महादेव कुलाळ हे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या जिद्द, चिकाटी आणि परिश्रमांचे कौतुक करण्यात आले. ग्रामीण भागातही योग्य सुविधा आणि अभ्यासाचे वातावरण उपलब्ध झाल्यास विद्यार्थी मोठे यश मिळवू शकतात, याचे हे जिवंत उदाहरण असल्याचे मान्यवरांनी आपल्या मनोगतातून अधोरेखित केले.
मान्यवरांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी प्रेरणा देत, सातत्यपूर्ण प्रयत्न, योग्य मार्गदर्शन आणि आत्मविश्वास यांच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते, असा मौलिक संदेश दिला.
कार्यक्रमास ग्रामस्थ, पालक व विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
या यशस्वी कार्यक्रमाचे आयोजन तरडगाव ग्रामपंचायत ग्रंथालयाच्या वतीने करण्यात आले होते.

Post a Comment
0 Comments