Type Here to Get Search Results !

ग्रीनफिल्ड कंपनीची 24,73,851/- रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला लोणंद पोलीसांनी कर्नाटकातुन केली अटक.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

ग्रीनफिल्ड कंपनीची 24,73,851/- रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला लोणंद पोलीसांनी कर्नाटकातुन केली अटक.




ग्रिन फिल्ड अॅग्रीकेम इंडस्ट्रीज प्रा. लि. तरडगाव या कंपनीची 24,73,851/- रुपयांची अग्री फसवणुक केलेल्या आरोपीस कर्नाटक राज्यातुन अटक करण्यास लोणंद पोलीसांना आले यश

लोणंद पोलीस स्टेशन हददीत तरडगाव ता. फलटण जि. सातारा येथे असलेली ग्रिन फिल्ड अॅग्रीकेम

इंडस्ट्रीज प्रा. लि. तरडगाव या कंपनीचे जाहीरात प्रतिनिधी म्हणुन काम पाहणारे तत्कालीन रवि कुमार हलनायक वय

52 रा. 1966/73 एस.एस. लेआऊट, ए ब्लॉक पि.यु कॉलेज अथनी जवळ 9 क्रॉस दावणगेरे पिन कोड - 577004

राज्य कर्नाटक यांनी त्यांचे डिलर साथीदार रविकुमार नाईक रा. मदकरीपुर लंबाना हटटी चित्रदुर्ग कर्नाटक पिन

577524, क्रयान्ना मंजुनाथ रा. 4TH डिव्हीजन बी.बी. रोड चिकबल्लालपुर कर्नाटक 562101, महेंद्र सिदधप्पा

मस्तीहल्ला रा. पो. ऑफिस चिपागेरी मुन्डगौडु उत्तर कन्नड कनार्टक 581402, शिवाप्पा मंजुनाथ रा. अंगारेकनहळळी

चिक्काबळळापुर कर्नाटक 562101, राघवेंद्र शिवाप्पा चन्नाहाल्ली रा. 258 / A एन.एच. रोड कोहल्ली आय्यानुर

कोहल्ली ता. जि. शिमोगा कर्नाटक पि कोड 577211 यांचेशी संगणमत करुन ग्रिन फिल्ड अॅग्रीकेम इंडस्ट्रीज प्रा.लि.

कंपनी तरडगाव यांची आर्थीक फसवणुक करण्याचे हेतुने कंपनीमधुन सन 2024 मध्ये खते व औषधे असा माल घेवुन

मालाचे थोडेच पैसे कंपनीला परत करुन उर्वरीत रक्कम ही कंपनीला आज देतो उद्या देतो असे म्हणुन सुमारे

24,73,851/- रुपयांची कंपनीची आर्थीक फसवणुक केलेली होती. त्यावरुन लोणंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजि.

नंबर 133/2026 भान्यासं. 318(4), 316(4), 3(5) प्रमाणे गुन्हा रजि. दाखल करण्यात आला होता.

तांत्रीक माहीतीचे आधारे सदर आरोपींचे लोकेशन घेणे चालु होते. तसेच एक तपास पार्टी आरोपी शोध

घेणेकामी यापुर्वी गेली होती परंतु आरोपी मिळुन आले नाहीत. त्यानंतर आरोपी नामे रवि कुमार हलनायक हा

दावणगेरे कर्नाटक राज्य येथे आलेबाबत खात्रीशीर माहीती मिळाल्याने पोलीस पथकाने तेथे जावुन विद्यानगरी येथील

पोलीस स्टाफची मदत घेवुन सापळा रचुन आरोपी रवि कुमार हलनायक यास ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीस

अटक करुन आरोपीस मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधीकारी सो, फलटण न्यायालय येथे हजर ठेवले असता न्यायालयाने

आरोपीची दिनांक 14/05/2026 रोजी पर्यंत पोलीस अभिरक्षा मंजुर केली आहे.

सदरची कामगीरी ही मा. श्री निखील पिंगळे पोलीस अधीक्षक सातारा, मा. वैशाली कडुकर अपर पोलीस

अधीक्षक सातारा, विशाल कृष्णा खांबे उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री

शिवाजी जायपत्रे सहा. पोलीस निरीक्षक, श्री रोहीत हेगडे पोलीस उपनिरीक्षक, विजय पिसाळ सहा. पोलीस फौजदार,

पोलीस हवालदार राहुल वाघ, पोलीस नाईक बापुराव मदने, पोलीस कॉन्स्टेबल अवधुत धुमाळ, अमोल जाधव, शेखर

शिंगाडे यांनी सहभाग घेतला होता.

सदर कारवाईबाबत वरिष्ठांनी हार्दिक अभिनंदन केले आहे....

Post a Comment

0 Comments