Type Here to Get Search Results !

डीपी चोरीच्या गुन्हयातील पाच वर्षे फरार असलेल्या आरोपीच्या वाठार पोलीसांनी आवळल्या मुसक्या.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

डीपी चोरीच्या  गुन्हयातील पाच वर्षे फरार असलेल्या आरोपीच्या वाठार पोलीसांनी आवळल्या मुसक्या.

              वाठार स्टेशन पोलीसांची दमदार कामगिरी 

 दिनांक २०/०५/२०२६ रोजी पाहिजे फरारी आरोपीमधील एक आरोपी हा लोणंद पोलीस स्टेशन हदीत त्याचे रहाते घरी आला असल्याची खात्रीशिर गोपणीय बातमी डीबी पथकास मिळताच कार्यक्षम सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशिल भोसले  यांनी त्यांचे डीबी टीमचे अंमलदार यांचेसह तात्काळ रवाना होऊन  लोणंद पोलीस स्टेशनकडील डीबी टीम यांना सोबत घेऊन सदर ठिकाणी जाऊन वेगवेगळया दोन टीम तयार केल्या व योग्य नियोजनबद्ध  सापळा रचून गेले पाच वर्षापासुन डीपी चोरीच्या गुन्हयात फरारी असलेला व वारंवार चकमा देवून पळुन जाणा-या आरोपीस एक किलोमिटर पर्यंत ऊसाचे शेतात  पाठलाग करुन लपलेल्या आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. 

 सदरची कारवाई मा.निखील पिंगळे, पोलीस अधिक्षक सो.सातारा, मा.डॉ. वैशाली कडुकर अप्पर पोलीस अधिक्षक सी. सातारा. मा. श्रीमती राजश्री तेरणी, उपविभागिय पोलीस अधिकारी कोरेगाव यांचे मार्गदर्शनाखाली सुशिल भोसले, सहायक पोलीस निरीक्षक, प्रभारी अधिकारी वाठार पोलीस स्टेशन, गहिनीनाथ सातव, पोउनि, नितीन भोसले, पोउनि, बुवा सो वाघमारे सपोफौ.पो. हवा. उदय जाधव, जितेंद्र शिंदे, सहदेव तुपे, विवेक शिंदे, संदीप गोरे, आनंदराव भोसले, अमोल कर्णे, पोलीस अंमलदार विठठल काळे,  प्रकाश मेळावणे, प्रतिक देशमुख,महीला पोलीस अंमलदार दिपाली गुरव, माधुरी दिक्षीत, आशा देशमुख तसेच लोणंद पोलीस स्टेशन कडील  पोलीस उपनिरीक्षक, विशाल जगताप व त्याची डीबी टिम यांनी सदर कारवाईत सहभाग घेतला असून सदर गुन्हयाचा तपास पोहवा/किशोर गिरी हे करीत आहेत.



Post a Comment

0 Comments