Type Here to Get Search Results !

सुरवडी येथील युवासेना शाखेचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

सुरवडी येथील युवासेना शाखेचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन. 




सुरवडी ता.फलटण जि.सातारा येथील युवासेना शाखेचे उद्योगमंत्री मा.ना. डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.२५५ फलटण -कोरेगाव विधानसभा मतदारसंघ पदाधिकारी निवड आढावा,BL-2 नोंदणी अभियान व फलटण नगर परिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती पंचवार्षिक निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व मान्यवर सदस्यांचा भव्य सत्कार समारंभ फलटण येथील अनंत मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता.

फलटण तालुक्यामध्ये शिवसेनेला श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.फलटण कोरेगाव मतदारसंघात गाव तेथे शिवसेना शाखा असा संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा झंझावात सुरू आहे यामध्ये युवकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे फलटण कोरेगाव मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढत असल्याचे दिसून येत आहे.

याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर,मा.खा.राहुल शेवाळे, शिवसेना जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत जाधव, शिवसेना फलटण तालुका अध्यक्ष नानासो उर्फ पिंटु इवले, कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण चे माजी संचालक किरण (नाना) साळुंखे,अंकुशराव साळुंखे, नेताजी साळवे व युवा सेना शाखेचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments