सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
वाठार स्टेशन पोलिसांचा मोठा दणका;जुगार अड्ड्यावर छापा टाकून सात आरोपी ताब्यात.
दिनांक २७/०५/२०२६ रोजी श्री. सपोनि सुशील भोसले यांना गोपणिय बातमीदारा मार्फत खबर मिळाली की मौजे बिचुकले ता. कोरेगाव जि. सातारा गावचे हददीत पळसवाट नावाचे शिवारात काही लोक पैसे लावुन तीन पानी जुगार खेळत आहेत. अशी माहीती मिळताच त्यांनी पो.उ.नि. सातव व डी. बी. पथकास बोलावुन सदर ठिकाणी जावुन खात्री करा व योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिल्याने पोहवा उदय जाधव यांनी दोन पंचांना बोलावुन घेवुन पोलीस स्टाफ व पंच सदर ठिकाणी जावुन अचानक छापा टाकुन ७ इसम जागीच पकडुन त्या आरोपींची नावे १. अर्जुन नारायण पवार वय ५० वर्षे २. मानसिंग साहेबराव पवार वय ६१ वर्षे ३. विनोद हणमंत पवार वय ४५ वर्षे ४. शिवाजी नथु शिंदे वय ७० वर्षे ५. अरुन धर्माजी सपकाळ वय ६५ वर्षे ६. बाळकष्ण चंदरराव पवार वय ४७ वर्षे सर्व रा बिचुकले ता कोरेगाव जि सातारा ७. आण्णा शंकर पवार वय ४६ वर्षे रा. गुजरवाडी ता कोरेगाव त्यांचेकडे मिळुन आलेले जुगाराचे साहित्य, मोटार सायकली, डावात व अंगझडतीत मिळुन आलेली रोख रक्कम असा एकुण ३,४५,५००/- रुपये किमतीचा मुददेमाल ताब्यात घेवुन पोलीस स्टेशनला आणुन त्यांचेवर वाठार पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाची खबर पोकॉ. विठठल काळे यांनी दिली असुन गुन्हयाचा तपास पोहवा जितेंद्र शिंदे हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा. निखील पिंगळे, पोलीस अधिक्षक सो सातारा, मा. डॉ. वैशाली कडुकर अप्पर पोलीस अधिक्षक सो. सातारा, मा. श्रीमती राजश्री तेरणी, उपविभागिय पोलीस अधिकारी कोरेगाव यांचे मार्गदर्शनाखाली सुशिल भोसले, सहायक पोलीस निरीक्षक, प्रभारी अधिकारी वाठार पोलीस स्टेशन, पोउनि. गहिनीनाथ सातव, पोउनि नितीन भोसले, पो. हवा. उदय जाधव, जितेंद्र शिंदे, प्रकाश चव्हाण, पोलीस अंमलदार विठठल काळे, प्रतिक देशमुख, तेजस कर्णे, विजय ढाणे, महीला पोलीस हवा. दिपाली गुरव माधुरी दिक्षीत, आशा देशमुख, पुजा जगताप यांनी सदर कारवाईत भाग घेतला होता.

Post a Comment
0 Comments