Type Here to Get Search Results !

साखरवाडी येथील 14 वर्षीय मुलगा बेपत्ता..

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

साखरवाडी/वैभव जगताप 

साखरवाडी येथील 14 वर्षीय मुलगा बेपत्ता..


साखरवाडी, ता. फलटण, जि. सातारा | दि. 26 जुलै 2026 साखरवाडी येथील गणेश नगर, वर्धमान मंगल कार्यालय शेजारी राहणारा संकल्प संदीप रुपनवर, वय 14 वर्षे हा आज दिनांक 26/07/2026 रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घरातील कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेला आहे.

घरातून निघून गेल्यापासून त्याचा सर्वत्र शोध घेतला असता तो कोठेही मिळून आलेला नाही. कुटुंबीयांनी नातेवाईकांकडे तसेच परिसरात शोध घेतला असून अद्याप त्याचा पत्ता लागलेला नाही.

संकल्प याचा रंग, उंची व परिधान केलेले कपडे याबाबत माहिती मिळताच तात्काळ कुटुंबीयांशी संपर्क साधावा.

हा मुलगा कोणाला आढळून आल्यास किंवा त्याबाबत काही माहिती मिळाल्यास कृपया खालील मोबाईल नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन त्याच्या कुटुंबीयांकडून करण्यात आले आहे.

संपर्क : विद्या संदीप रुपनवर - 98 90 020408

पत्ता : रा. गणेश नगर, वर्धमान मंगल कार्यालय शेजारी, साखरवाडी, ता. फलटण, जि. सातारा.

नागरिकांना विनंती आहे की, ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून बेपत्ता मुलाला शोधण्यासाठी सहकार्य करावे.

Post a Comment

0 Comments