Type Here to Get Search Results !

फलटण पंचायत समितीच्या माजी सभापती रेश्माताई भोसले यांची सातारा जिल्हा शिवसेना महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी निवड.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

फलटण पंचायत समितीच्या माजी सभापती रेश्माताई भोसले यांची सातारा जिल्हा शिवसेना महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी निवड.



फलटण पंचायत समितीच्या माजी सभापती आणि शिवसेना पक्षाच्या मुलुख मैदान तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सौ. रेश्माताई राजेंद्र शामराव भोसले यांची सातारा जिल्हा शिवसेना (शिंदे गट)जिल्हाध्यक्ष - महिला आघाडी पदी निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून हार्दिक अभिनंदन होत आहे.

शिवसेना पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांच्या आजवरच्या कार्याची दखल घेऊन ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. पंचायत समिती सभापती म्हणून काम करत असताना रेश्माताई भोसले यांनी ग्रामीण भागातील महिला, शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडली होती. त्यांच्या आक्रमक आणि स्पष्टवक्त्या शैलीमुळे त्या शिवसेनेतील मुलुख मैदान तोफ म्हणून परिचित आहेत.

फलटण तालुक्यासह संपूर्ण सातारा जिल्ह्यात शिवसेना महिला आघाडीचे संघटन मजबूत करण्यासाठी त्यांचा अनुभव निश्चितच उपयोगी पडेल, असा विश्वास पक्षातील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. महिला सक्षमीकरण, ग्रामीण विकास आणि पक्ष संघटन वाढीसाठी त्या नव्या जोमाने काम करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

या निवडीनंतर फलटण तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला भगिनी आणि नागरिकांकडून रेश्माताई भोसले यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

फलटण तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा - रेश्माताईंच्या पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

Post a Comment

0 Comments