सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
खंडणी प्रकरणातील दोन महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीस शिताफीने केले जेरबंद.
फलटण शहर पोलीस ठाणे डी.बी. पथकाची धडाकेबाज कामगिरी
खंडणी मागून मारहाण व दुकानाची तोडफोड केल्याप्रकरणी गेल्या दोन महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला फलटण शहर पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने शिताफीने ताब्यात घेऊन अटक केली आहे. या कामगिरीमुळे फलटण शहर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
दि. १९/०५/२०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजेच्या सुमारास फिर्यादी हे किंग युनिसेक्स पार्लर नावाने हेअर कटिंगचे दुकानामध्ये काम करत असताना, त्यांच्या दुकानासमोर एक काळ्या रंगाची लाल पट्टा असलेली शाईन मोटारसायकल क्र. MH ५३ ८१९२ वर दोन इसम आले.
त्यांनी दुकानात घुसून फिर्यादीला शिवीगाळ केली. त्यातील पांढऱ्या रंगाचा शर्ट व जिन्स पॅन्ट असलेल्या इसमाने कमरेतून सुमारे दोन फुटाचे धारदार लोखंडी हत्यार बाहेर काढून दाखवून म्हणाला की, "मला अभि भाई म्हणतात, तू मला ओळखतोस का? तू दुकान चालू केले आहे, तुला खल्लास करीन, तू मला महिन्याला १०,०००/- रुपये हफ्ता दे" अशी धमकी दिली.
धमकी देऊनच न थांबता त्याने फिर्यादी व दुकानातील मुलांना धारदार लोखंडी हत्याराने मारहाण करून दुकानातील सामानाची तोडफोड केली होती. या प्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. दाखल करण्यात आला होता.
पोलिसांची कारवाई
सदर गुन्ह्यातील आरोपी अभिजीत अरुण जाधव रा. मलठण, ता. फलटण यास यापूर्वीच अटक करण्यात आली होती. तर त्यातील दुसरा आरोपी हा गुन्हा घडल्यापासून फरार झाला होता.
फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी मा. निखील पिंगळे सो. पोलीस अधीक्षक सातारा व वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सो. सातारा यांनी सूचना दिल्या होत्या. त्यांच्या सूचनेप्रमाणे श्री. धन्यकुमार गोडसे उपविभागीय पोलीस अधिकारी सो. फलटण, श्री. घनश्याम बल्लाळ पोलीस निरीक्षक फलटण शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलीस ठाणे येथील डी.बी. पथकाचे एक तपास टीम तयार करण्यात आली होती.
सदर टीमने सातत्याने फरार असलेल्या आरोपीचा माग काढून आज रोजी आरोपी नामे अक्षय संजय जाधव रा. मलठण, ता. फलटण यास शिताफीने ताब्यात घेऊन अटक केली आहे.
ही धडाकेबाज कामगिरी मा. पोलीस अधीक्षक सो. सातारा, अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांचे सूचनेप्रमाणे व श्री. धन्यकुमार गोडसे, उपविभागीय पोलीस अधिकारी सो. फलटण व श्री. घनश्याम बल्लाळ, पोलीस निरीक्षक, फलटण शहर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली डी. बी. पथकाचे पोहवा संतोष नाळे, पो.कॉ. जितेंद्र टिके, पो.कॉ. अतुल बडे यांनी केलेली आहे.

Post a Comment
0 Comments