सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
वीर धरणातून नीरा नदीपात्रात 5713 क्युसेक विसर्ग - नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरण प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे.
दिनांक 30 जुलै 2026 रोजी रात्री ठीक 10:00 वाजता वीर धरणातून नीरा नदीपात्रात एकूण 5713 क्युसेक इतका विसर्ग सोडण्यात येणार आहे.
याबत नीरा उजवा कालवा विभाग, फलटण चे कार्यकारी अभियंता यांनी माहिती दिली आहे.
धरणातून होणारा विसर्ग असा असेल :
• सांडव्यावरून : 4613 क्युसेक • अतिवाहकाद्वारे (Over Flow) : 1100 क्युसेक • एकूण विसर्ग : 5713 क्युसेक
पावसाच्या प्रमाणानुसार आणि धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकेनुसार या विसर्गात पुन्हा वाढ किंवा घट करण्याची शक्यता असल्याचेही प्रशासनाने कळवले आहे.
नागरिकांना आवाहन :
या विसर्गामुळे नीरा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होणार आहे. त्यामुळे नीरा नदीकाठच्या सर्व गावांमधील नागरिकांनी सावधानता बाळगावी.
1. नदीपात्रात कोणीही उतरू नये. 2. जनावरे, शेती अवजारे, मोटार पंप नदीकाठावरून तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवावेत. 3. नदीवरील बंधारे, पूल ओलांडताना काळजी घ्यावी. 4. अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.
कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत संबंधित तहसील कार्यालय किंवा फलटण येथील पाटबंधारे विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment
0 Comments