Type Here to Get Search Results !

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक : तरडगाव सोसायटीकडून आ. दिपकराव चव्हाण यांच्या नावाचा बिनविरोध ठराव मंजूर

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक : तरडगाव सोसायटीकडून आ. दिपकराव चव्हाण यांच्या नावाचा बिनविरोध ठराव मंजूर.

तरडगाव, ता. फलटण : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Satara DCC Bank) होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तरडगाव विकास सेवा सोसायटीच्या प्रतिनिधीसाठी फलटण कोरेगाव मतदार संघाचे माजी आमदार मा. दिपकराव चव्हाण साहेब यांच्या नावाचा बिनविरोध ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे.

तरडगाव विकास सेवा सोसायटीची विशेष बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी सोसायटीच्या वतीने प्रतिनिधी पाठवण्याबाबत चर्चा झाली. यावेळी सर्व संचालकांनी एकमुखाने आ. दिपकराव चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

आ. दिपकराव चव्हाण यांचे सहकार क्षेत्रातील योगदान, शेतकऱ्यांप्रती असलेली तळमळ आणि फलटण तालुक्याच्या विकासासाठी केलेले कार्य लक्षात घेता त्यांच्यासारखा अनुभवी नेता जिल्हा बँकेवर जाणे गरजेचे आहे, अशी भावना सर्व संचालकांनी व्यक्त केली. त्यांच्या नेतृत्वाखाली बँक अधिक शेतकरीहिताचे निर्णय घेईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

हा ठराव मंजूर होताच तरडगाव परिसरात कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

या बिनविरोध ठरावाबद्दल श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब) श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी तरडगाव विकास सेवा सोसायटीचे मनःपूर्वक अभिनंदन केले 

या वेळी फलटण पंचायत समितीचे माजी सभापती वसंत काका गायकवाड,मालोजीराजे बँकेचे संचालक सुभाषकाका गायकवाड सातारा जिल्हा खरेदी विकी संघाचे संचालक राजेंद्र गायकवाड,सोसायटीचे चेअरमन दशरथ बनकर व्हॉईस चेअरमन दशरथ शिंदे,सचिव नितीन रणवरे  तसेच सर्व संचालक मंडळ उपस्थित होते

Post a Comment

0 Comments