Type Here to Get Search Results !

सातारा LCB ची दमदार कामगिरी : १३ लाखांचा चोरी गेलेला पाण्याचा टँकर २४ तासात हस्तगत, दोघे जेरबंद

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

सातारा LCB ची दमदार कामगिरी : १३ लाखांचा चोरी गेलेला पाण्याचा टँकर २४ तासात हस्तगत, दोघे जेरबंद


पाडेगाव येथील शेती संशोधन केंद्राजवळ उभा असलेला १३ लाख रुपये किमतीचा पाण्याचा टँकर चोरणाऱ्या दोन चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांनी अवघ्या २४ तासात जेरबंद केले असून चोरीस गेलेला टँकर हस्तगत केला आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक २६/०७/२०२६ रोजी सायंकाळी ७ वाजल्यापासून ते दिनांक २८/०७/२०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंतच्या दरम्यान मौजे पाडेगाव, ता. फलटण, जि. सातारा येथील शेती संशोधन केंद्र कार्यालयाजवळील मोकळ्या जागेत पार्किंगसाठी लावलेला सगुणामाता कन्स्ट्रक्शन प्रा. लि. फलटण या कंपनीचा निळ्या पांढऱ्या रंगाचा टाटा कंपनीचा पाण्याचा टँकर (MH-12-DT-3139) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता. या प्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३३६/२०२६ BNS कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.


या वाहन चोरीच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्री. निखील पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती डॉ. वैशाली कडूकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विश्वजीत घोडके यांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर यांच्या अधिपत्याखाली एक विशेष तपास पथक तयार करण्यात आले होते.


दिनांक २९/०७/२०२६ रोजी पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, लिंबखिंड परिसरातील नॅशनल हायवेच्या सर्व्हिस रोडला दोन इसम निळ्या पांढऱ्या रंगाचा टँकर घेऊन विक्रीसाठी ग्राहक शोधत आहेत. या माहितीच्या आधारे तपास पथक तात्काळ लिंबखिंड येथे रवाना झाले.


पथकाने सर्व्हिस रोडवर पाहणी केली असता MH-12-DT-3139 क्रमांकाचा टँकर उभा असलेला दिसला. त्याच्याजवळ MH-53-4944 क्रमांकाच्या स्प्लेंडर मोटारसायकलवर दोन संशयित इसम बसलेले होते. पथकाने त्यांना टँकर बाबत विचारणा केली असता त्यांनी तो टँकर त्यांचाच असल्याचे सांगितले. मात्र कागदपत्रांची मागणी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. अधिक सखोल चौकशी केली असता त्यांनी आपल्या आणखी एका साथीदाराच्या मदतीने पाडेगाव येथून सदर टँकर चोरी करून विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली.

यावरून लोणंद पोलीस ठाण्याचा गुन्हा उघडकीस आला असून पोलिसांनी १३,००,०००/- रुपये किमतीचा टँकर हस्तगत केला आहे.

अटक करण्यात आलेले आरोपी :

१) अनिकेत सुनील लकडे, वय २५, रा. लकडे वस्ती, पाडेगाव, ता. फलटण

२) शुभम विनोद जैस्वाल, वय १८, रा. दगडे वस्ती, नीरा, ता. पुरंदर, जि. पुणे

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सपोनि अभिजीत यादव, रोहीत फरांदे, पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर, चंद्रकांत पुजारी, तसेच अंमलदार संतोष सपकाळ, साबीर मुल्ला, सचिन साळुंखे, मंगेश महाडीक, सनी आवटे, हसन तडवी, अमोल माने, राकेश खांडके, सुजित भोसले, अमित झेंडे, मुनीर मुल्ला, अजय जाधव, नवनाथ कदम, मनोज जाधव, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, राजू कांबळे, अरुण पाटील, शिवाजी भिसे, स्वप्नील दोंड, विजय निकम यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments